घरताज्या घडामोडीमी काँग्रेससोबत गेलो नाही, मला भाजपाने ढकलले - उद्धव ठाकरे

मी काँग्रेससोबत गेलो नाही, मला भाजपाने ढकलले – उद्धव ठाकरे

Subscribe

'आता बोललं जातंय की मी काँग्रेससोबत गेलो. पण मी स्वत: नाही गेलो मला भाजपाने ढकलले. मी आता पुन्हा सांगतोय कारण आपल्यातील गैरसमज दुर व्हायला हवेत', अशा शब्दांत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला.

‘आता बोललं जातंय की मी काँग्रेससोबत गेलो. पण मी स्वत: नाही गेलो मला भाजपाने ढकलले. मी आता पुन्हा सांगतोय कारण आपल्यातील गैरसमज दुर व्हायला हवेत’, अशा शब्दांत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला. आज उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील उत्तर भारतीयांच्या मेळाव्याला उपस्थिती दर्शवली होती. त्यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपावर हल्लाबोल केला. (uddhav thackeray attack on BJP Amit Shah pm modi bjp )

“आता बोलत आहात की मी काँग्रेससोबत गेलो. पण मी स्वत: नाही गेलो मला भाजपाने ढकलले. मी आता पुन्हा सांगतोय कारण आपल्यातील गैरसमज दुर व्हायला हवेत. 2014 साली मी युती नव्हती तोडली. भाजपाने युती तोडली होती. तेव्हाही मी हिंदूच होतो. आजही मी हिंदू आहे. सुरूवातील तुम्ही युती तोडली. नामांकन पत्र दाखल करण्याच्या एकदिवस अगोदर भाजपाने युती तोडली. पण आम्ही न खचता एकटे लढलो होतो. त्यावेळी आमचे 63 उमेदवार जिंकून आले होते. त्यावेळी भाजपाला असे वाटले की आपण एकटे सरकार स्थापन करू शकतो. पण त्यांना आमची मदत घ्यावी लागली होती. त्यानंतर अमित शाह घरी आले होते. त्यावेळी त्यांनी मला वचन दिले होते की, पण त्यांनी त्या वचनाचे पालन केले नाही”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

“माझ्या वडिलांनी कधीच कोणाची गुलामी करण्याचे शिकवले नाही. माझ्या वडिलांना अन्यायाविरोधात लढण्यास शिकवले. पण या लोकांनी गळ्यात पट्टे लावून त्यांची गुलामी केली. मी लढणाऱ्या वडिलांचा लढणारा मुलगा आहे. मी कधीच खोटं बोलणार नाही”, असेही ठाकरे म्हणाले.

“महाराष्ट्रात एकवेळ अशी होती की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बैठकीत जनता त्यांचा चेहऱ्याचा मास्क लावून येत होती. परंतू आता सर्व बदलल असेल, पंतप्रधान मोदींना महाराष्ट्रात येण्यासाठी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या चेहऱ्याचा मास्क लावून यावे लागत असेल”, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टोला लगावला.

- Advertisement -

“मला सांगावे मी कुठे चूक केली आहे, मी अडीच वर्षे मुख्यमंत्री होतो. मी तेव्हा कुठे चूक केली. आपापसात मी कधी भांडण लावली. ज्या शिवसैनिकांनी मुंबई वाचवली ते आज माझ्यासोबत आहेत. आणि जे आता जे हिंदूत्वाबद्दल बोलत आहेत, ते तेव्हा कुठे होते. कुठे होते ते तेव्हा काय माहीत? त्यावेळी ज्यांनी मुंबई वाचवली त्यांनी तुम्ही गुन्हेगार ठरवत आहात. पण आता सध्या सुरू आहे, ते आपल्याला मान्य आहे का? तुम्हाला लढायचे असेल तर तुम्ही मैदानात उतरा”, असेही ठाकरे म्हणाले.


हेही वाचा – मोगॅम्बो खुश हुआ! अमित शाहांच्या पुणे दौऱ्यावर उद्धव ठाकरेंची टीका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -