घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

मृदु आणि कठिण । हे स्पर्शाचे दोन्ही गुण । जे वपूचेनि संगें कारण । संतोषखेदां ॥
आता मऊपणा व कठीणपणा हे स्पर्श या विषयाचे दोन फरक आहेत; ते इंद्रियामुळे शरीराच्या संसर्गाने सुख व दुःखाला कारण होतात.
भ्यासुर आणि सुरेख । हें रूपाचें स्वरूप देख । जें उपजवी सुख-दु:ख । नेत्रद्वारें ॥
तसेच भेसूर आणि सुरेख अशी दोन लक्षणे रूपविषयाची आहेत; पण ती डोळ्यांनी पाहिल्यावर दुःख व सुख उत्पन्न होते.
सुगंधु आणि दुर्गंधु । हा परिमळाचा भेदु । जो घ्राणसंगें विषादु । तोषु देता ॥
त्याचप्रमाणे, गंधविषयाचे सुंगध व दुर्गंध हे दोन फरक आहेत. हे घ्राणेंद्रियव्दारां संतोष व असंतोष उत्पन्न करतात.
तैसाचि द्विविध रसु । उपजवी प्रीतित्रासु । म्हणौनि हा अपभ्रंशु । विषयसंगु ॥
त्याप्रमाणेच दोन प्रकारचा रस प्रीति आणि त्रासही उत्पन्न करतात. म्हणून विषयसंग हाच मुख्य स्वरूपापासून भ्रष्ट करणारा आहे.
देखैं इंद्रिया आधीन होईजे । तैं शीतोष्णांतें पाविजे । आणि सुख-द:खीं आकळिजे । आपणपें ॥
असे पहा की, जे इंद्रियाधीन होतात, त्यांना शीतोष्णांची बाधा होऊन ते आपोआपच सुख-दुःखांचे आधीन होतात.
या विषयांवांचूनि कांहीं । आणीक सर्वथा रम्य नाहीं । ऐसा स्वभावोचि पाहीं । इंद्रियांचा ॥
इंद्रियाची खोडच अशी आहे की, या विषयांशिवाय त्यांना जगतात रम्य असे दुसरे काहीच वाटत नाही.
हे विषय तरी कैसे । रोहिणीचें जळ जैसें । कां स्वप्नींचा आभासे । भद्रजाति ॥
हे विषय कसे आहेत, याचा विचार केला तर, मृगजळाप्रमाणे किंवा स्वप्नांतील ऐश्वर्याप्रमाणे भासतात.
देखैं अनित्य तियापरी । म्हणौनि तूं अव्हेरीं । हा सर्वथा संगु न धरीं । धनुर्धरा ॥
तसे हे विषय अनित्य आहेत, असा निश्चय कर आणि पार्था, त्यांची यत्किंचितही संगती न धरता तू त्यांचा त्याग कर.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -