घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरसमृद्धी महामार्गावर भीषण अपघात; मेहकरजवळ कार उलटून 2 मुले 4 महिलांचा मृत्यू

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; मेहकरजवळ कार उलटून 2 मुले 4 महिलांचा मृत्यू

Subscribe

समृद्धी महामार्ग मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. या मार्गावर रविवारी सिंदखेड राजा - दुसरबीड दरम्यान भीषण अपघात झाला. यात सहा जण ठार तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.

Accident at Sindkhed Raja on Samriddhi Highway बुलढाणा – समृद्धी महामार्ग मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. या मार्गावर रविवारी मेहकरजवळ भीषण अपघात झाला. यात सहा जण ठार तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. हे सर्व एकाच परिवारातील असल्याची माहिती समोर येत आहे. समृद्धी महामार्ग सुरु झाल्यापासून 40 हून अधिक अपघात झाले असून, हा त्यातील सर्वात गंभीर अपघात मानला जात आहे.

कुठे झाला अपघात
समृद्धी महामार्गावर मेहकरजवळ शिवनी पिसा गावाजवळ नागपूर कॉरिडॉरवर गाडीचा अपघात झाला. या अपघातात सहा जण जागीच ठार झाले. मृतांमध्ये चार महिला आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे. तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना मेहकर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बहुतांश जखमी तसेच मृत हे छत्रपती संभाजीनगरमधील एन-11 येथील सौभाग्यनगर येथील रहिवाशी आहे.

- Advertisement -

कसा झाला अपघात
हा अपघात रविवारी सकाळी लोणार तालुक्यातील शिवणी पिसा ते दुसरबीड दरम्यान झाला. भरधाव वेगातील इर्टिगा रस्त्यावरील डिव्हायडरला जाऊन धडकली आणि गाडी तीन ते चार पलट्या मारून दुसऱ्या बाजूच्या रस्त्यावर उलटली. या अपघातामध्ये चार जण घटनास्थळीच ठार झाले तर दोन जणांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

लोकार्पणापासून 40 अपघात
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्ग शिर्डीपर्यंत तयार झाला आहे. या मार्गाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झाले आहे. समृद्धी महामार्गाचे लोकार्पण झाल्यापासून आतापर्यंत ४० हून अधिक अपघात झाले आहे. यात रविवारी सकाळी झालेला अपघात सर्वात मोठा मानला जात आहे. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे, तर पाच जण गंभीर जखमी आहेत.

- Advertisement -

महामार्गावर दुर्घटना घडल्यानंतर क्विक रिस्पॉन्स टीम दाखल होईल असं म्हटलं गेलं होतं. मात्र रविवारी अपघात घडल्यानंतर तास भर हे पथक घटनास्थळी पोहोचलं नाही, अशी स्थानिकांची तक्रार आहे. कोणाचीही मदत अपघातग्रस्तांना झालेली नाही. बचाव पथक वेळेवर दाखल झाले असते तर काही जखमींना वाचवण्यात यश आले असते, असंही स्थानिकांचे म्हणणे आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -