घरदेश-विदेशसरकारने रद्दीतून कमावले कोट्यावधी रुपये

सरकारने रद्दीतून कमावले कोट्यावधी रुपये

Subscribe

नवी दिल्ली : केंद्रातल्या मोदी सरकारने स्वच्छतेचे महत्त्व पटवून जवळपास ६,१५४ कार्यालयांची स्वच्छता केली आहे. ही सफाई करताना जमा झालेल्या रद्दीतून केंद्र सरकारला तब्बल 62.54 कोटी रुपयांचा महसूल मिळाला असल्याची माहिती केंद्रिय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी आज लोकसभेत दिली.

केंद्रातल्या मोदी सरकारने त्यांच्या पहिल्या टर्ममध्येच स्वच्छ भारत मोहीम राबवताना नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. केंद्र सरकारने स्वच्छतेची मोहीम राबवली असून जवळपास 6,154 कार्यालयांची स्वच्छता केली आहे. ही स्वच्छता करताना त्यातून जमा झालेल्या रद्दीची मोदी सरकारने विक्री केली आहे. या रद्दीच्या विक्रीतून केंद्राला थोडेथोडके नाहीतर तब्बल 62.54 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. तसेच यामुळे व्यापलेली 12.01 लाख चौरस फूट जागाही मोकळी झाली आहे. एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना केंद्रिय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी ही लोकसभेत ही माहिती दिली.

- Advertisement -

हेही वाचा – अदानी मुद्द्यावरून विरोधकांचा ईडी कार्यालयावर मोर्चा, टीएमसी-राष्ट्रवादी मोर्चात सहभागी नाही

केंद्र सरकारकडून केंद्रिय मंत्रालये, विभागांमध्ये आणि त्यांच्या संलग्न कार्यालयांमधील प्रलंबित कामे मार्गी लावण्यासोबतच संस्थात्मक पातळीवर प्रत्येकाला स्वच्छतेचे भान यावे यासाठी 2 ते 31 ऑक्टोबर 2021 या कालावधीत पहिली विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेतंर्गत केंद्र सरकारच्या 6154 हून अधिक कार्यालयांनी भाग घेतला होता. या 6154 कार्यालयांची सफाई करताना महिनाभर चाललेल्या या मोहिमेदरम्यान रद्दी आणि भंगार सामानाची विल्हेवाट लावून तब्बल 62.54 कोटी रुपयांचा महसूल मिळाला असल्याची माहिती केंद्रिय मंत्र्यांनी दिली. याशिवाय कार्यालयातील सुमारे 12.01 लाख चौरस फूट जागाही रिकामी झाली आहे.

- Advertisement -

मोकळ्या जागेत उपहारगृह, ग्रंथालये सुरू
स्वच्छता मोहिमेदरम्यान रद्दी विकून मोकळ्या झालेल्या 12.01 चौरस फूट जागेचा वापर विविध कामांसाठी होत असल्याची माहिती केंद्रीय मंत्र्यांनी दिली. मोकल्या झालेल्या जागेत उपाहार गृह, ग्रंथालये, परिषद, बैठकांसाठी सभागृह, निरामय केंद्रे आणि पार्किंग अशा विविध कामांसाठी वापर होत आहे.

हेही वाचा – शरद पवारांच्या पावसातील भाषणावरून अजित पवारांचा कार्यकर्त्यांना मिश्किल सल्ला; म्हणाले…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -