घरदेश-विदेशभाजप -शिंदे शिवसेनेचे जागावाटप कसे होणार? अमित शाहांनी दिले 'हे' उत्तर

भाजप -शिंदे शिवसेनेचे जागावाटप कसे होणार? अमित शाहांनी दिले ‘हे’ उत्तर

Subscribe

महाराष्ट्रातील शिवसेना-भाजप यांच्यातील जागावाटपाबाबत दोन्ही पक्षाचे नेते एकत्र बसून ठरवू, हा मोठा विषय नाही, असे अमित शाह यावेळी म्हणाले

राज्यात सत्तांतर झाले आणि भाजप- शिंदेंच्या शिवसेना युतीचे सरकार स्थापन झाले. आता हीच युती पुढे कायम ठेवत आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुका भाजप- शिवसेना एकत्र लढवणार आहेत. मात्र या निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेला किती जागा देणार याबाबत काही निर्णय झालेला नाही. आता यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना प्रश्न विचारला असता, त्यांनी मिश्किल उत्तर दिले आहे. मात्र, काही दिवसांपूर्वीच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेनेला 50 जागा देणार असल्याचे म्हटले होते.

काय म्हणाले अमित शाह?

महाराष्ट्रात आम्ही आणि शिवसेनेने एकत्र निवडणूक लढवली होती. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात निवडणूक लढवली गेली. काॅंग्रेस- राष्ट्रवादीने निवडणूक हरल्यानंतर उद्धव ठाकरेंना तुम्हाला मुख्यमंत्री करतो म्हणून सांगितले, त्यानंतर ते मुख्यमंत्री झाले. पण जेव्हा जनसेमध्ये गेले तेव्हा वैचारिक मतभेद समोर यायला लागले. कारण शिवसेना कित्येक वर्ष हिंदुत्वाचे राजकारण करत होती. त्यामुळे शिवसैनिक त्यांच्या लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारत होता, असे अमित शाह म्हणाले.

- Advertisement -

आमदार-खासदार तिकडून पळाले ते आमच्यामुळे पळाले नाहीत. जनतेच्या दबावामुळे ते तिकडून निघाले. भाजप- शिवसेना एकत्र राहावी, असे जनतेलाच वाटत होते. आता असली शिवसेना आमच्यासोबत आली आहे. शिवसेना आणि आम्ही एकत्र येऊन सरकार बदलले. निवडणुका लढवू आणि निवडणुका जिंकू, असा विश्वास अमित शाह यांनी व्यक्त केला.

2019 ची निवडणूक स्वबळावर लढलो असतो तर बहुमत मिळाले असते. पण शिवसेना आमची जुनी सहकारी होती, त्यामुले आम्ही विश्वास ठेवला, असे अमित शाह यांनी सांगितले.

- Advertisement -

( हेही वाचा: मोदी-अदानी संबंधांवर काॅंग्रेस आक्रमक; 31 मार्चला राज्यभर घेणार पत्रकार परिषदा )

ही खरी शिवसेना आहे त्यामुळे त्यांच्या भाजपमध्ये विलिनिकरणाचा प्रश्नच नाही. ही खरी शिवसेना आहे, निवडणूक आयोगानेही हे सिद्ध केले आहे. धनुष्यबाणाचे चिन्हही त्यांना देण्यात आले आहे. भाजप- शिवसेना एकत्र निवडणुका लढतील, विलिनिकरणाचा कोणताच प्रश्न नाही आणि असा कोणताही प्रस्ताव नाही, असे अमित शहा यावेळी म्हणाले.

जागावाटपाबाबत अमित शाहांचे उत्तर

महाराष्ट्रातील शिवसेना-भाजप यांच्यातील जागावाटपाबाबत दोन्ही पक्षाचे नेते एकत्र बसून ठरवू, हा मोठा विषय नाही. गरज पडली तर तुम्हालाही बोलावू, असा मिश्किल टोलाही अमित शाह यांनी पत्रकाराला लगावला, आणि त्यावर सगळेच हसू लागले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -