घरताज्या घडामोडीApple layoffs: मंदीचा फटका; अ‍ॅपलकडून कर्मचाऱ्यांना नारळ

Apple layoffs: मंदीचा फटका; अ‍ॅपलकडून कर्मचाऱ्यांना नारळ

Subscribe

गेल्या काही महिन्यांपासून जागतीक मंदीची चर्चा सुरु आहे. अनेक बड्या कंपन्यांनी कर्मचारी कपात केली आहे. यामध्ये गुगल, Amazon, फेसबुकची मदर कंपनी मेटा यांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, Appleच्या कर्मचारी कपातीच्या निर्णयाचा फटका कंपनीच्या डेव्हलपमेंट आणि प्रिझर्व्हेशन टीमला बसणार आहे.

मागील काही महिन्यांपासून जगभरातील बड्या कंपन्या हजारोंच्या संख्येने कर्मचारी कपात करत आहेत. कोरोना काळानंतर सर्वच देशांचं अर्थचक्र मंदावल्याने अनेक कंपन्यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. अशातच आयफोन बनवणारी कंपनी Appleनंही कर्मचारी कपातीला सुरुवात केल्याची माहिती समोर येत आहे. (Apple Layoffs After Google Amazon Meta iPhone Maker VVP96)

गेल्या काही महिन्यांपासून जागतीक मंदीची चर्चा सुरु आहे. अनेक बड्या कंपन्यांनी कर्मचारी कपात केली आहे. यामध्ये गुगल, Amazon, फेसबुकची मदर कंपनी मेटा यांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, Appleच्या कर्मचारी कपातीच्या निर्णयाचा फटका कंपनीच्या डेव्हलपमेंट आणि प्रिझर्व्हेशन टीमला बसणार आहे. पण नेमकी किती कर्मचारी कपात होणार आहे, याबाबची माहिती अद्याप अस्पष्ट आहे.

- Advertisement -

हेही वाचा – एलॉन मस्कने बदलला ट्वीटरचा लोगो; ‘Doge’ सोडल्याने युझर्स हैराण

Appleने कर्मचाऱ्यांना पुन्हा Apply करायला सांगितले आहे, अन्यथा त्यांची हाकालपट्टी केली जाणार असल्याचे समजते. या कर्मचारी कपातीचा फटका Appleच्या रिटेल स्टोअर्स आणि इतर सुविधा केंद्रांतील कर्मचाऱ्यांना बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

- Advertisement -

जगभरात महागाई वाढत असल्याने आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो आहे. या महागाईमुळे व्याजाचे दर वाढले असून, याचा फटका अनेक बड्या टेक कंपन्यांना बसला आहे. यामध्ये फेसबुकची पॅरेंट कंपनी मेटानं दोन टप्प्यात कर्मचारी कपात केली. पहिल्या टप्प्यात ११,००० त्यानंतर त्यानंतर १०,००० कर्मचाऱ्यांना काढून टाकलं होतं.

गेल्यावर्षी गुगलने आपल्या १२,००० कर्मचाऱ्यांना काढून टाकले होते. कंपनीची आर्थिक परिस्थिती अधिक बिकट होण्यापूर्वीच हा निर्णय घेण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे. त्याचबरोबर Amazon ने २७,००० कर्मचाऱ्यांची दोन टप्प्यात कपात केली होती. पहिल्या टप्प्यात १८,००० कर्मचारी तर दुसऱ्या टप्प्यात ९,००० कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आली होती.


हेही वाचा – धक्कादायक! अमेरिकेतील सीएनएनपासून ते वॉशिंग्टन पोस्टपर्यंतच्या सर्व मीडियात कर्मचारी कपात

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -