घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रयेवल्यात भुज‘बळ’, मालेगांवमध्ये पालकमंत्री भुसेंना धक्का; जिल्ह्याच्या राजकारणात मोठे उलटफेर

येवल्यात भुज‘बळ’, मालेगांवमध्ये पालकमंत्री भुसेंना धक्का; जिल्ह्याच्या राजकारणात मोठे उलटफेर

Subscribe

नाशिक : येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांपैकी १५ जागांवर भुजबळ गटाने दणदणीत विजय मिळवला तर दराडे गटाला केवळ तीन जागांवर समाधान मानावे लागले. बाजार समिती निवडणुकी प्रचारात स्वतः भुजबळ उतरल्याने निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती. त्यातच उध्दव ठाकरे गटाचे आमदार नरेंद्र दराडे यांनी भुजबळांना आव्हान दिल्याने या निवडणुक निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. तर मालेगांमध्येही ११ पैकी १० जागांवर विजय मिळत शिवसेना उपनेते अव्दय हिरे यांनी पालकमंत्री दादा भुसे गटाला धुळ चारली.

येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचे शेतकरी विकास पॅनल तर भाजपाचे बाबा डमाळे, अ‍ॅड. माणिकराव शिंदे यांच्या नेतृत्वात पक्षविरहित शेतकरी समर्थक पॅनल या दोन पॅनलमध्ये सरळ लढत झाली. सेनेचे संभाजी पवार भुजबळांबरोबर आले तर सेनेचे आमदार दराडे बंधुंनी शिंदे गटासोबत हातमिळवणी केली. त्यामुळे येवल्यात महाविकास आघाडीत फुट पडल्याचे दिसून आले. या निवडणुक प्रचारात दराडे यांनी भुजबळांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवण्याचे आव्हान दिले. त्यामुळे बाजार समिती निवडणुकीवरून भुजबळ दराडे यांच्यात चांगलीच जुंपली. भुजबळांनीही दराडे बंधुंनी माझयाविरोधात निवडणुकीला उभे राहून दाखवावे असे आव्हान केले होते. सलग चार वेळा ते येवला मतदार संघातून निवडून आले आहे.

- Advertisement -

राज्यातील उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री यांसह अनेक महत्वाची मंत्रीपदाचा कारभार भुजबळ यांनी केला आहे. येवला मतदार संघातील विकासाचे श्रेय भुजबळ यांना दिले जाते. तर दुसरीकडे आमदार नरेंद्र दराडे यांनी अटीतटीच्या लढतीत विधानपरिषदेत बाजी मारली होती. त्यानंतर आमदार नरेंद्र दराडे यांनी त्यांचे बंधु किशोर दराडे यांना देखील आमदार म्हणून निवडून आणले होते. शैक्षणिक संस्था आणि मोठे प्रस्थ असलेले दराडे हे शिवसेनेत उभी फुट पडल्यानंतरही उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहिले आहे. भुजबळ एवढ्यावरच थांबले नाहीत भुजबळ यांनी दराडे यांनी जिल्हा बँक बुडवली म्हणत हल्लाबोल करत आमदारकीच्या निवडणुकीला माझ्या समोर उभे राहून दाखवावे असे आवाहन केले होते. हेच आव्हान आमदार दराडे यांना जिव्हारी लागले. त्यांनी त्यावर भाष्य करत भुजबळ यांच्यावरच गंभीर आरोप केले.

छगन भुजबळ यांच्यावर आमदार दराडे यांनी आरोप करत जिल्हा बँक तुमच्या सारख्या मोठ्या लोकांना कर्ज दिली म्हणून बुडाली आहे. तुम्हीच कोट्यवधी रुपये बुडविले आहे. याशिवाय भुजबळ तुम्ही माझ्या शेपटावर पाय देऊ नका म्हणत तुम्ही उपरे आहात आम्ही भूमिपुत्र आहोत म्हणत दराडे यांनी भुजबळ यांचे आव्हान स्वीकारले. त्यामुळे बाजार समितीच्या आखडयात कोण बाजी मारतो याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर १८ पैकी २ अपक्षांसह १५ जागांवर भुजबळ गटाने विजश्री प्राप्त केली. त्यामुळे येवल्यात पुन्हा एकदा भुजबळांनी आपलाच दबदबा कायम असल्याचे या माध्यमातून दाखवून दिले.

- Advertisement -

५० खोके एकमद ओक्के

शिंदे गटाचे मंत्री तथा नाशिक जिल्हयाचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या होमपीचर म्हणजेच मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे गटाने सरशी घेतली आहे. मालेगाव बाजार समितीत सोसायटी गटाच्या 11 जागांपैकी 10 जागा उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचे उपनेते डॉ. अद्वय हिरे यांच्या महाविकास आघाडी प्रणीत कर्मवीर भाऊसाहेब हिरे पॅनलने मिळवल्या. मागील 20 वर्षांपासून बाजार समितीवर पालकमंत्री भुसे यांच्या समर्थकांची सत्ता आहे. सोसायटी गटाचा कल लक्षात घेता अद्वय हिरे पालकमंत्री दादा भूसेंना धक्का दिला आहे. यावेळी हिरे समर्थकांकडून जल्लोष करण्यात येऊन 50 खोके एकदम ओकेच्या घोषणा दिल्या.

लासलगावला थोरे गटाची सरशी

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये थोरे गटाला १८ पैकी ९ तर माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आणि जयदत्त होळकर यांच्या नेतृत्त्वाखालील पॅनलला ८ तर एक जागेवर अपक्ष उमेदवाराचा विजय झाला आहे. या १८ जागांमध्ये १० जुने पुन्हा विजयी झाले असून बाजार समितीच्या माजी सभापती सुवर्णा जगताप व त्यांचे पती हे दोघेही निवडून आले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -