घरमहाराष्ट्रभाकरी फिरवायला गेलो पण भाकरीच थांबली; शरद पवारांची प्रतिक्रिया

भाकरी फिरवायला गेलो पण भाकरीच थांबली; शरद पवारांची प्रतिक्रिया

Subscribe

राष्ट्रवादीतून आणि देशभरातील नेत्यांकडून राजीनामा मागे घेण्याच्या तीव्र भावना उमटल्या यांचा मान राखत पवार यांनी पत्रकार परिषद घेत राजीनामा मागे घेत असल्याचं सांगितलं आणि भाकरी फिरवायला गेलो पण भाकरीच थांबली अशी प्रतिक्रिया दिली आहे.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी युवक काँग्रेसच्या कार्यक्रमात भाकरी फिरवायची वेळ आल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर त्यांनी लोक माझे सांगाती या त्यांच्या पुस्ताकाच्या प्रकाशन सोहळ्यावेळी अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचं म्हणत, खळबळ उडवून दिली. त्यानंतर राष्ट्रवादीतून आणि देशभरातील नेत्यांकडून राजीनामा मागे घेण्याच्या तीव्र भावना उमटल्या यांचा मान राखत पवार यांनी पत्रकार परिषद घेत राजीनामा मागे घेत असल्याचं सांगितलं आणि भाकरी फिरवायला गेलो पण भाकरीच थांबली अशी प्रतिक्रिया दिली आहे.(  I went to rotate the bread but the bread itself stopped Sharad Pawar’s reaction on NCP President post left )

शरद पवार नेमकं काय म्हणाले?

लोक माझ्या सांगाती या माझ्या आत्मचरित्रपर पुस्तक प्रकाशन समारंभाच्यावेळी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त् होण्याचा निर्णय जाहीर केला होता. सामाजिक जीवानतील प्रदीर्घ प्रवासानंतर मी सदर जबाबदारीतून मुक्त व्हावे, अशी माझी भूमिका होती. पण मी घेतलेल्या निर्णयाने जनमानसात तीव्र भावना उसळली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी आणि माझे सांगाती असलेले जनतेमध्ये अस्वस्थता निर्माण झाली, असं शरद पवार म्हणाले.

- Advertisement -

माझी जबाबदारी नैतिक अशी होती. मी सर्वांना विश्वासात घेतलं असतं तर त्यांनी परवानगी दिली नसती. पण मी त्यांना विश्वासात घ्यायाल हवं होतं, हे मी मान्य करतो. राजीनाम्यानंतर प्रतिक्रिया उमटेल हे माहिती होती. पण इतकी तीव्र प्रतिक्रिया उमटेल असं वाटलं नव्हतं, असं शरद पवार म्हणाले.

उत्तराधिकारी कोण असणार?

उत्तराधिकारी असणं हे माझं स्पष्ट मत आहे. पण उत्तराधिकारी राजकीय पत्र ठरवत नसतात. लोक एकत्र काम करतात. सर्व सहकारी म्हणून काम करतात. हा कुणा एका व्यक्तीचा निर्णय असू शकत नाही, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं. उत्तराधिकारी ही कन्सेप्ट त्यातली नाही. पण एक गोष्ट माझ्या मनात आहे. ती मी माझ्या सहकाऱ्यांना सांगेन आणि चर्चा करेल की, राजकारणात काही नव्या चेहऱ्यांना संधी दिली पाहिजे, असं शरद पवार यांनी सांगितलं.

- Advertisement -

( हेही वाचा: राष्ट्रवादी फुटीच्या वाटेवर; शरद पवार म्हणाले, आम्ही नक्कीच… )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -