घरमहाराष्ट्र"नार्वेकर तर मोठे वकील, आम्ही अनपढ.."; जितेंद्र आव्हाडांची खोचक टीका

“नार्वेकर तर मोठे वकील, आम्ही अनपढ..”; जितेंद्र आव्हाडांची खोचक टीका

Subscribe

16 आमदारांच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर टीका करत आहेत. त्यांच्यानंतर आता जितेंद्र आव्हाड यांनी देखील नार्वेकरांवर टीका केली आहे. नार्वेकर तर मोठे वकील आहेत, आम्ही अनपढ आहोत, असं खोचक वक्तव्य आव्हाडांनी केले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील सत्ता संघर्षाच्याबाबत 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर सोपवला आहे. त्यामुळे या प्रकरणी नार्वेकर नेमके काय निर्णय याकडे सगळ्यांचेच लक्ष लागलेले आहे. राहुल नार्वेकर यांनी परदेशातून दाखल होताच या प्रकरणी कार्यवाही करण्यास सुरूवात केली आहे. राहुल नार्वेकर यांनी प्रकरणी बैठक घेतल्यानंतर लगेच पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या 16 आमदारांच्या बाबतीतली पुढील प्रक्रिया काय असणार, याबद्दलची माहिती दिली. पण यामुळे ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी नार्वेकर यांच्यावर टीकास्त्र डागले आहे. त्यानंतर आता या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि आमदार असलेले जितेंद्र आव्हाड यांनी देखील नार्वेकरांवर टीका केली आहे. नार्वेकर तर मोठे वकील आहेत, आम्ही अनपढ आहोत, असं खोचक वक्तव्य आव्हाडांनी केले आहे. (“Rahul Narvekar is a great lawyer, we are illiterate..”; Jitendra Awhad’s scathing criticism)

हेही वाचा – राहुल नार्वेकर ठाकरे गट आणि शिवसेनेतील 54 आमदारांना बजावणार नोटीस

- Advertisement -

प्रसाप माध्यमांशी बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, सुप्रिम कोर्टाच्या निकालावर टिपणी करणे म्हणजे शिंदे गटाची बाजू घेणे आहे. ज्या पदावर ते आहेत, सुप्रीम कोर्टाचे म्हणणे त्यांचे म्हणणे या दोन्ही गोष्टींमध्ये विरोधाभास आहे. कोर्टाने स्पष्टपणे तुम्हाला मर्यादा आहे, असे म्हटले आहे. कोर्टाने पक्षातील फूट नाकारली आहे. ते नाही म्हटल्यावर काय उरतेय, असा प्रश्न आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.

तसेच, राजकीय पक्षाने नेता आणि व्हीप नेमणे अपेक्षित आहे, हे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. कोण राजकीय पक्ष होता? महाराष्ट्राला मूर्ख समजता का? शिवसेना पक्ष शिंदे गटाकडे फेब्रुवारीमध्ये गेला. 22 जुलैला त्यावरून निर्णय कसा लावणार? असे म्हणत जितेंद्र आव्हाड म्हणाले की, मला आश्चर्य वाटतेय त्यांच्या सारखा सुशिक्षित चतुर असे कसे काय बोलू शकतो? हे रूल बुक आहे. नार्वेकर तर मोठे वकील आहेत, आम्ही अनपढ आहोत, अशी टीका देखील आव्हाड यांनी यावेळी केली.

- Advertisement -

आम्हाला काय करायचेय, त्याचे रिपोर्ट कार्ड तपासा नाही तर काही करा. सुप्रीम कोर्टाने अधिकार दिले म्हणून त्यांच्या निकालावर टिपणी करणे म्हणजे एक बाजू घेणे होते. पक्ष अभिनिवेश बाजूला ठेवून सुप्रीम कोर्टाने सांगितले तसे निर्णय घ्या, असेही जितेंद्र आव्हाड यांच्याकडून यावेळी सांगण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -