घरमहाराष्ट्रनाशिक'असे निर्णय देशाला परवडणारे नसतात'; 2000 रुपयांच्या नोटबंदीवर राज ठाकरे कडाडले

‘असे निर्णय देशाला परवडणारे नसतात’; 2000 रुपयांच्या नोटबंदीवर राज ठाकरे कडाडले

Subscribe

नाशिक : आरबीआयने (RBI) बाजारातून 2000 रुपयांच्या नोटा मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. यावर बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले की, असे निर्णय देशाला परवडणारे नसतात. ते आगामी लोकसभा निवडणुकीसाठी नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले.

राज ठाकरे म्हणाले की, तुम्हाला आठवत असेल तर त्याचवेळी मी एक भाषण केले होते. हा जो धर-सोडपणा आहे, तो चुकीचा आहे. तज्ज्ञांना विचारुन असे निर्णय घ्यायचे असतात. त्यावेळी नव्या नोटा आणल्या त्या एटीएममध्ये जात नव्हत्या. नव्या नोटा या एटीएम मशिनमध्ये जातात की नाही, हेही पाहिलं नव्हतं. हे असले निर्णय देशाला परवडणारे नसतात. उद्या लोकांनी बँकेत नोटा परत द्यायच्या, पुन्हा तुम्ही नवीन नोटा आणायच्या. असे जनतेवर प्रयोग करायचे नसतात. असं सरकार चालत नसतं. अशी घणाघाती टीका राज ठाकरे यांनी नोटबंदी आणि आता २००० रुपयांची नोट बंद करण्यावर केली आहे.

- Advertisement -

दरम्यान, नोव्हेंबर 2016मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदी जाहीर करताना 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या होत्या. त्यानंतर आरबीआयने 2000 हजार रुपयांची नोट चलनात आणली. 2016-17 या आर्थिक वर्षात 2000 रुपयांच्या 35429.91 कोटी नोटा छापल्या होत्या. यानंतर 2017-18 मध्ये अत्यंत कमी 1115.07 कोटी नोटा छापण्यात आल्या. 2019-20, 2020-21 आणि 2021-22 या तीन आर्थिक वर्षांमध्ये 2000 रुपयांची एकही नोट छापलेली नाही. यानंतर आता आरबीआयने 2000 रुपयांच्या नोटा मागे घेण्याची घोषणा केली आहे.

सध्या बाजारात असलेल्या 2 हजार रुपयांच्या नोटा व्यवहारासाठी वापरता येणार नाहीत. या नोटा 30 सप्टेंबरपर्यंत वैध राहतील. तोपर्यंत ज्यांच्याकडे 2 हजार रुपयांच्या नोटा आहेत, त्यांना बँकेते जाऊन नोटा बदलून घ्याव्या लागणार आहेत. या 2000 रुपयांच्या नोटा बँकांमध्ये 23 मेपासून बदलण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. नागरिकांना 30 सप्टेंबरपर्यंत एकावेळी फक्त 20 हजार रुपयांपर्यंत 2000 रुपयांच्या नोटा बदलता येणार आहेत. तथापि, यासाठी बँकांना विशेष खिडकी उघडावी लागणार आहे, असेही आरबीआयने शुक्रवारी (19 मे) स्पष्ट केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -