घरदेश-विदेशपाकिस्तानी गायक राहत फतेह अली खानला ED ची नोटीस

पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खानला ED ची नोटीस

Subscribe

पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खानवर आरोप आहे की त्यांनी परकीय चलनाची तस्कारी केली आहे. खान याने केलेल्या तस्करीमुळे त्यांच्याकडून दंड आकारला जाणार आहे.

प्रसिद्ध पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खानला अंमलबजावणी संचलनालयाने (ED) कारवाई करण्याची नोटीस बजावली आहे. परकीय चलन व्यवस्थापन कायदा (FEMA) तोडून परकीय चलनाची तस्करी करण्याचा आरोप राहत फतेह अली खानवर आहे. ईडीने कारणे दाखवा नोटीस बजावली असून जर राहतने त्याचे उत्तर दिले नाही तर दंडनीय कारवाई करण्यात येणार आहे. याचबरोबर भारतात होणाऱ्या शोवरही बंदी घातली जाणार असल्याचे ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rahat fateh ali khan (@rahatfatehalikhan736) on

- Advertisement -

काय आहेत आरोप

ईडीने केलेल्या आरोपाअंतर्गत गायक राहत फतेह अली खान याच्या जवळ ३ लाख ४० हजार डॉलर्स (२.४२ कोटी रुपये) हे अवैध पद्धतीने आढळून आले आहेत. या पैशातील २ लाख २५ हजार डॉलर्सची (१.६ कोटी रुपये) खानने तस्करी केली आहे. या पैशाचा हिशोब देण्यासंदर्भात ईडीने नोटीस दिली आहे. ईडीच्या या नोटीसनंतर राहतला उत्तर देणे आवश्यक आहे. अन्यथा त्यांच्या जवळून ३ पट दंड आकारण्यात येणार असल्याचे ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

यापूर्वीही केली होती कारवाई

राहत फतेह अली खानला या पूर्वीही ईडीने नोटीस दिली होती. २०११ साली राहत १ लाख २५ हजार डॉलर्स (८९.१ लाख रुपये) अवैध चलनासोबत पकडल्या गेला होता. या पैशाचा त्याच्याकडे हिशोब नसल्यामुळे दिल्ली एअरपोर्टवर त्याच्यावर कारवाई करण्यात आली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -