घरताज्या घडामोडीआज नितीश कुमारांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार, ३१ मंत्री घेणार शपथ

आज नितीश कुमारांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार, ३१ मंत्री घेणार शपथ

Subscribe

बिहारमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपला धक्का देत तेजस्वी यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल, काँग्रेससोबत हात मिळवणी केली. त्यामुळे नितीश कुमार यांनी भाजपला धक्का त्यांचे ऑपरेशन लोटस हाणून पाडले आहे. नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज १६ ऑगस्टला होणार आहे. तसेच ३१ मंत्री शपथ घेणार असल्याचे सांगितले जात आहे.

काँग्रेसचे २, आरजेडी १६, जेडीयू ११, ‘हम’चे १ आणि १ अपक्ष सदस्य मंत्री होणार आहेत. सकाळी ११.३० वाजल्यापासून राजभवनात शपथविधीचा कार्यक्रम सुरू होईल. या सरकारमध्ये आरजेडीचे सर्वाधिक ७९ आमदार आहेत, तर जेडीयूचे आमदार दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तेज प्रताप यादव, सुरेंद्र यादव, रामानंद यादव, चंद्रशेखर, आलोक मेहता, ललित यादव, समीर महाशेठ, सरबजीत, सुरेंद्र राम, शाहनवाज, अख्तरुल साहीन हे राजदकडून मंत्री होणार आहेत.

- Advertisement -

काँग्रेसला तीन मंत्रीपदं मिळतील, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भक्तचरण दास यांनी रविवारी सांगितले होते. बिहार युनिटचे प्रभारी दास यांनी सांगितले होते की, १६ ऑगस्ट रोजी काँग्रेसचे २ आमदार मंत्री म्हणून शपथ घेतील, तर पुढील मंत्रिमंडळ विस्तारादरम्यान आणखी एका आमदाराचा सरकारमध्ये समावेश केला जाईल.

डाव्या विचारसरणीच्या सीपीआय (एमएल) ने १२ आमदारांसह राज्यात स्थापन झालेल्या नवीन सरकारला बाहेरून पाठिंबा जाहीर केला आहे, तर भारतीय कम्युनिस्ट पार्टीने रविवारी सांगितले की, सीपीआयला मिळाले तरच पक्षाला सन्माननीय प्रतिनिधित्व मिळेल. नितीश कुमार यांचे सन्माननीय प्रतिनिधित्वच्या मंत्रिमंडळात सामील होऊ इच्छितो. नितीश कुमार २४ ऑगस्टला विश्वासदर्शक ठराव मांडणार आहेत. १० ऑगस्ट रोजी महाआघाडीचे सरकार स्थापन झाले. नितीश कुमार यांनी भाजपपासून फारकत घेत सात पक्षांच्या महाविकास आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता.

- Advertisement -

नितीश यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या नव्या मंत्रिमंडळाबाबत चर्चा सुरू झाली होती. बिहारमध्ये पुन्हा महाआघाडीचे नेतृत्व करणारे नितीश यावेळीही गृहखाते आपल्याकडे ठेवण्याची शक्यता आहे. यासोबतच २० लाख लोकांना रोजगार देणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा : सलमान रश्दींवरील हल्ल्यानंतर गुप्तचर संस्था सतर्क, नुपूर शर्मांचा धोका?


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -