Live Update : विकास विकास आणि विकासावर के.सी. राव यांच्याशी चर्चा केली – शरद पवार 

eknath shinde vs shiv sena uddhav thackeray maharashtra government mva political crisis mla bjp sharad pawar wari 2022

विकास विकास आणि विकासावर के.सी. राव यांच्याशी चर्चा केली – शरद पवार


देशातील परिवर्तन लढ्यात पवारांना साथ द्या – के.सी.राव


तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची शरद पवारांसोबत बैठक संपली.पवार आणि राव यांच्या देशाच्या राजकारणावर चर्चा  करण्यात आली.


आमच्या भेटीट काहीच गुप्तता नाही. देशात गढूळ आणि सुडाचं राजकारण सुरू आहे. देशातील सुडाच्या राजकारणाविरोधात आमचा लढा आहे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


 

महाराष्ट्र – तेलंगणा भविष्यात एकत्र काम करणार – के. सी . राव


बैठकीत राजकारण आणि विकास कामांवर चर्चा – के.सी. राव


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. सी. राव यांचा  माध्यमांशी संवाद


तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांसोबत वर्षा बंगल्यावर अर्ध्या तासापासून बैठक सुरू आहे. या बैठकीला मंत्री एकनाथ शिंदे, अरविंद शिंदे, संजय राऊत यासारखे शिवसेनेचे प्रमुख नेते उपस्थित आहेत. साऊथ अभिनेता प्रकाश राज तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्यासाठी विमानतळावर गेला होता.


 

तेलंगणाचे मुख्यमंत्री वर्षा बंगल्यावर दाखल


नाना पटोलेंचे मुंबईच्या रस्त्यावर उतरुन मोदींविरोधात आंदोलन


पंतप्रधान मोदींच्या वक्तव्याचा विरोध करण्यासाठी मुंबईत काँग्रेस नेत्यांचे आंदोलन


 

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या सिंधुदुर्ग मालवण चिवला बीचवरील बंगल्यासंदर्भात कारवाई करण्याचे आदेश महाराष्ट्र कोस्टल प्राधिकरणाला दिले आहेत.


तेलंगणाचे मुख्यमंत्री के. सी. राव मुंबईत दाखल


पश्चिम बंगालचे मंत्री साधन पांडे यांचे आज मुंबईत निधन झाले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ट्विट द्वारे ही माहिती दिली आहे.


नेरुळमधील मनसे शाखेचे अमित ठाकरे यांच्या हस्ते उद्धाटन


मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्क परिसरातील नागरिक, क्लब सदस्य आणि खेळाडू आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार आहे. सकाळी साडे अकरा वाजता राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी बैठक पार पडणार आहे. शिवाजी पार्क मैदानात सध्या सुरू असलेल्या कामासंदर्भात नागरिकांच्या काही हरकती सूचना आहेत, त्यासंदर्भात या बैठकीत चर्चा केली जाणार आहे.