घरअर्थजगतदिवाळीत खरेदीसाठी व्हा तयार; Flipkart घेऊन आलाय बिग दिवाळी सेल

दिवाळीत खरेदीसाठी व्हा तयार; Flipkart घेऊन आलाय बिग दिवाळी सेल

Subscribe

दिवाळीमध्ये खरेदी करण्यासाटी तयार व्हा, कारण ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट ‘बिग बिलियन डेज’ सेलनंतर ‘बिग दिवाळी सेल’ चं आयोजन करत आहे. हा सेल २९ ऑक्टोबरपासून सुरू होणार असून ४ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. सेल दरम्यान, अ‍ॅक्सिस बँकेच्या क्रेडिट, डेबिट कार्ड आणि ईएमआय व्यवहारांवर १० त्वरित सूट मिळणार आहे. फ्लिपकार्ट प्लसच्या सदस्यांना सेलमध्ये लवकर प्रवेश मिळेल. HDFC, ICICI, SBI सारख्या बड्या बँकांसह बजाज फायनान्सवरही नो-कॉस्ट ईएमआय पर्याय आहे.

स्मार्टफोनवर मोठ्या ऑफर्स

फ्लिपकार्टच्या बिग दिवाळी सेलमध्ये स्मार्टफोनवर ऑफर्सचा पाऊस पडणार आहे. Samsung Galaxy F41, Samsung Galaxy M31, Samsung Galaxy S20+, Samsung Galaxy Note 10 Plus, Samsung Galaxy A50s या स्मार्टफोन्सवर ऑफर्सचता पाऊस पडणार आहे. तुम्हाला रियलमीचे फोन घ्यायचे असतील तर Realme C15, Realme Narzo 20, Realme Narzo 20 Pro या फोन्सवर डिस्काऊंट असणार आहे.

- Advertisement -

इलेक्ट्रॉनिक्स आणि अ‍ॅक्सेसरीजवर ८० टक्क्यांपर्यंत सूट

सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि अ‍ॅक्सेसरीजवर ८० टक्के सूट असणार आहे. स्मार्टफोनशिवाय फ्लिपकार्ट स्मार्ट वॉच आणि फिटनेस बँडवर ७० टक्के सवलत देत आहे. यामध्ये Realme, Xiaomi, Noise, Apple, Fitbit आणि Amazfit सारख्या ब्रँडच्या उत्पादनांचा समावेश आहे. सध्याच्या वातावरणात, कामासाठी लॅपटॉप खूप महत्वाचा आहे. सेलमध्ये लॅपटॉपवर ५० टक्क्यांपर्यंत सवलत मिळणार आहे. यात HP Pavillion, Apple MacBook Air, Acer Aspire, Asus VivoBook, Apple MacBook Pro, Dell Inspiron इत्यादींचा समावेश असेल.

दरम्यान, विक्री दरम्यान टीव्ही आणि उपकरणांवर ८० टक्क्यांपर्यंत सूट असेल. स्मार्ट टीव्हीची किंमत ८,९९९ रुपयांपासून सुरू होईल. स्वयंपाकघरातील उपकरणांची प्रारंभिक किंमत २४९ रुपये असेल. फ्रीज १५,९९० रुपयांपासून खरेदी करता येईल. कपड्यांवर तुम्हाला ५० ते ८० टक्के सूट मिळेल.

- Advertisement -

हेही वाचा – खरेदी करताना ‘व्होकल फॉर लोकल’ संदेश लक्षात ठेवा – पंतप्रधान मोदी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -