Wednesday, May 12, 2021
27 C
Mumbai
घर अर्थजगत खुशखबर: हिंदू नववर्षानिमित्त 'या' कार कंपनी देणार ग्राहकांना हजारो रूपयांचा डिसकाऊंट ऑफर

खुशखबर: हिंदू नववर्षानिमित्त ‘या’ कार कंपनी देणार ग्राहकांना हजारो रूपयांचा डिसकाऊंट ऑफर

ग्राहकांसाठी वेगवेगळ्या कार्स वर डिसकाऊंट ऑफर जाहीर केले आहेत. 

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्रामध्ये दरवर्षी चैत्र शुध्द प्रतिपदेला म्हणजेच गुढीपाडव्याला हिंदू संकृती प्रमाणे नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. त्याचप्रमाणे याच दिवशी देशातील अनेक राज्यात देखील बैसाखी, उगादी,बीहू सणांनी हिंदू नववर्षाची सुरवात करण्यात येते. आणि याच सणांच अवचित्त साधून अनेक लक्झरी कार कंपन्यांनी ग्राहकांसाठी वेगवेगळ्या कार्स वर डिसकाऊंट ऑफर जाहीर केले आहेत.

- Advertisement -

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी होंडा अमेज वर ३८ हजार रुपयांची तर होंडा डब्ल्यूआर-वी वर ३२ हजार ५०० रुपये, जैज वर ३२,हजार रुपये आणि आणि होंडा सिटी च्या पाचव्या जनरेशनच्या मॉडल वरती १०, हजार रुपये पर्यंतचा लाभ होऊ शकतो असे सांगण्यात आले आहे. तसेच कंपनी तर्फे ग्राहकांना या ऑफर्स अंतर्गत कॅश डिसकाऊंट व्यतिरिक्त काही अन्य ऑफर सुद्धा दिल्या  जाणार आहेत. जसे की अॅक्सेसरीज किंवा  कार बदलल्यानंतर सुद्धा डिसकाऊंट देण्यात येणार आहे. जुन्या ग्राहकांनसाठी कंपनीतर्फे विशिष्ट लाभाची योजना करण्यात आली आहे. या विशिष्ट लाभामधे एक्स्ट्रा बोनस पॉइंट तसेच जुन्या होंडा कार च्या बदल्यात नव्या कारवर विशेष एक्सचेंज ऑफरची पेशकश कंपनी तर्फे देण्यात आली आहे. या विशेष ऑफर बद्दल कंपनीचे सीनियर वाइस प्रेसिडेंट राजेश गोयल म्हणाले की ” ग्राहकांसाठी ही एक खूप खाससंधी आहे. या संधीचा पुरेपूर वापर ग्राहक करतील तसेच या वेळेस कंपनी चे अनेक नवीन ग्राहक कार खरेदीसाठी उत्सुक आहेत. आणि म्हणूनच कंपनीने या ऑफर्सची घोषणा केली आहे. तसेच कोरोना व्हायरस च्या प्रादुर्भावमुळे सर्वजनीक वाहनाचा वापर न करता आपल्या आरोग्याच्या काळजीसाठी खाजगी वाहन असणे गरजेचे आहे.” असेही वक्तव्य गोयल यांनी केल आहे.


हे हि वाचा -महाराष्ट्राला स्वतंत्रपणे लस खरेदी करू द्या; राज ठाकरेंचं पंतप्रधानांना पत्र

- Advertisement -