घरअर्थजगतHDFC बँकेने कर्जाच्या व्याजदरात एवढ केली वाढ

HDFC बँकेने कर्जाच्या व्याजदरात एवढ केली वाढ

Subscribe

मुंबई | देशातील खासगी बँक एचडीएफसीने (HDFC) मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ट लेंडिंग रेड (MCLR) मध्ये वाढ केल्यामुळे खातेदाराकांना मोठा धक्का बसला आहे. एचडीफसीने ०.०५ वरून ०.१५ टक्के कर्जा व्याजदरता एवढी वाढविला आहे. एचडीएफसीने एमसीएलआर वाढविल्यामुळे ग्राहकांच्या कर्जाचा ईएमआय वाढणार असून नवीन दर ८ मेपासून लागू झाले आहेत. आरबीआयने एमपीसी (MPC) बैठकीत पॉलिसी रेट किंवा रेपो रेटमध्ये कोणातही बदल न करता तसेच ठेवले आहेत.

एचडीएफसी बँकेने एका रात्रीत कर्जा व्याजदर ७.९५ टक्के केले आहे. याबरोबरच एक महिन्याच्या कालावधीनंतर यात वाढ होऊन ८.१० टक्के होणार आहे. तसेच तीन महिन्यानंतर ८.४० टक्के आणि सह महिन्यानंतर ८.८० टक्के कर्जाचा व्याजदर अशी वाढ होणार आहे. त्याबरोबरच एका वर्षात एमसीएलआर हा ९.०५ कर्ज व्याजदर होणार आहेत. बँक गृहकर्ज आणि वाहन कर्जासह बहुतांश ग्राहक कर्ज एका वर्षाच्या आत एमसीएलआरशी जोडणार आहे.

- Advertisement -

एका वर्षाच्या कालावधीत कर्जा दरात एमसीएलआर वाढल्यामुळे खातेदारकांना सर्वाधिक फटका बसणार आहे. कारण, वाहन कर्ज आणि गृह कर्जासाठी जास्त खर्च करावे लागणार आहे. बँकने इतर कालावधीच्या कर्जा बदलवण्यावर लक्ष दिले तर, दोन वर्षाचा एमसीएलआर ९.१० टक्के होणार आहे. तीन वर्षाच्या कालावधीसाठी दर ९.२० टक्के  झाला असून एचडीएफसी बँकेने कर्जदरात केलेल्या बदलामुळे नवीन ग्राहकांवर परिणाम होणार आहे. परंतु, जुन्या बँक खातेदारांना मात्र याचा फटाक बसणार नाही.

काय आहे एमसीएलआर

- Advertisement -

एमसीएलआर हा आरबीआयने लागू केलेला बेंचमार्क आहे. ज्या आधारे देशातील सर्व बँका कर्जासाठी त्यांचे व्याज दर निश्चित करातात, तर रेपो दरात या आधारे आरबीआय बँकांना कर्ज देते. आरबीआयकडून रेपो दराता कपात केल्यानंतर बँकांना स्वस्थ कर्ज मिळते आणि एमसीएलआरमध्ये कपात करून कर्जाचा ईएमआय कमी करतात. दुसरीकडे, जेव्हा रेपो दरात वाढ होते, तेव्हा बँकांना आरबीआयकडून महाग कर्ज मिळते. ज्यामुळे त्यांना एमसीएलआर वाढवण्याचा निर्णय घ्यावा लागतो आणि ग्राहकांचा बोजा वाढतो.

 

आयसीआयसीआय-एसबीआय बँक

एचडीएफसीने कर्जाच्या दरात वाढ केली आहे. यानंतर देशातील मोठ्या बँकांच्या कर्जात आयसीआयसीआय बँक एका रात्री आणि एक महिन्याच्या कर्जात एमसीएलआर दर ८.५० टक्के, तीन महिन्यांसाठी ८.५५ टक्के, सहा महिन्यांसाठी ८.७० टक्के आणि ८.७० टक्के कर्जा व्याजदर आहे. एका वर्षासाठी ८.७५ टक्के कर्ज व्याजदर होणार आहे. याव्यतिरिक्त देशातील सर्वात मोठी सरकार बँक एसबीआय (SBI) चा रात्रीचा एमसीएलआर दर ७.९० टक्के, एक महिना आणि तीन महिन्यांसाठी ८.१०  टक्के, सहा महिन्यांच्या कर्जासाठी ८.४०  टक्के आणि एक वर्षाच्या कर्जासाठी ८.५० टक्के आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -