घरअर्थजगतमहिंद्रा शहरात साकारणार लॉजिस्टिक पार्क

महिंद्रा शहरात साकारणार लॉजिस्टिक पार्क

Subscribe

नाशिक : महिंद्रा लॉजिस्टिक्स लिमिटेडतर्फे नाशिकमध्ये तब्बल पाच लाख चौरस फुटांचे लॉजिस्टिक पार्क साकारण्यात येणार आहे. त्र्यंबकरोडवरील वासाळी गावाजवळ पहिल्या महिंद्रा लॉजिस्टिक पार्कचे उद्घाटन महिंद्रा लॉजिस्टिकचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रामप्रवीण स्वामीनाथन यांच्या हस्ते करण्यात आले. लवकरच इतरही प्रकल्पांना सुरूवात करण्यात येणार असल्याचे स्वामीनाथन यांनी सांगितले.

यावेळी महिंद्रा लॉजिस्टिक्सचे उपाध्यक्ष प्रसन्ना पहाडे, लॉजिस्टिक्सचे संचालक तथा निमाचे माजी अध्यक्ष शशिकांत जाधव, संजय कोठुळे, महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्राचे व्हाईस प्रेसिडेंट चंद्रकांत धांडे, सॅमसोनाईटचे व्हाईस प्रेसिडेंट यशवंत सिंह, महिंद्रा नाशिक प्रकल्पाचे हिरामण आहेर, एबीबीचे उपाध्यक्ष गणेश कोठावदे आदी उपस्थित होते. नाशिकला प्रदूषणापासून वाचवायचे असेल तर आतापासूनच प्रदूषणकारी घटकांना शहरापासून दूर ठेवले पाहिजे, असे नमूद करताना अवजड वाहने, कंटेनर शहरात येऊ न देता शहराबाहेर एखादा लॉजिस्टिक पार्क उभारून त्या ठिकाणी त्यांची व्यवस्था करण्याचे केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी सूचित केले होते. मीरा भाईंदर, बदलापुर व भिवंडी येथे तीन हजार कोटी खर्चून तीन लॉजिस्टिक पार्क मंजुर केले आहेत. नाशिक महापालिकेच्या वतीनेही लॉजिस्टिक पार्कची उभारणी करण्यात येणार आहे.

- Advertisement -

तसेच, समृध्दी महामार्गालगतही लॉजिस्टिक पार्क उभारण्याचे नियोजन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये महिंद्राने सर्वप्रथम लॉजिस्टिक पार्कची मुहूर्तमेढ रोवत उद्योगांना एकप्रकारे चालना देण्याचा प्रयत्न केला आहे. उर्जा, संसाधनांचे संवर्धन आणि ग्रीन कव्हर यांचा समावेश या वेअरहाऊसमध्ये असल्याचे स्वामीनाथन यांनी सांगितले. या वेअरहाऊसमुळे २५० नवे रोजगार निर्माण होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी संदीप पवार, शिवाजी पिंगळे, महावीर कर्नावट, गोविंद सिंह, आदित्य आहुजा, अनिल प्रसाद, अमित पाटील, महेश पाटील, तुषार जाधव, किशोर पंडीत यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उद्येजक धनंजय बेळे, वरूण तलवार, निखील पांचाळ, मनीष रावल, ललित बूब, रावसाहेब रकिबे, निर्मला जाधव, स्नेहा जाधव आदी उपस्थित होते.

  • शेतकर्‍यांना वेअरहाऊससारखा शाश्वत उत्पन्न देणारा स्त्रोत उपलब्ध झाला आहे. त्यामुळे शेतीबरोबरच अशा प्रकारच्या व्यवसायातून उद्योगांना चालना मिळेल, असे वेअर हाऊसचे संचालक शशिकांत जाधव यांनी सांगितले. जाधव यांनी जागतिक दर्जाच्या कंपनीशी सल्लामसलत करून या वेअर हाऊसची उभारणी केली आहे.
  • या वेअरहाऊसमुळे सातपूर औद्योगिक वसाहतीत उभ्या राहणार्‍या ट्रक, कंटेनर्सची संख्या कमी होउन अपघातांचे प्रमाण घटेल. वेअरहाउसची क्षमता एक लाख चौरस फुटांची असून, ८० टक्के बुकिंग पूर्ण झाल्याचे उपाध्यक्ष प्रसन्ना पहाडे यांनी सांगितले.

लॉजिस्टिक पार्क म्हणजे काय ?

लॉजिस्टिक पार्कची प्रामुख्याने औद्योगिक वसाहतीमध्ये गरज असते. कंपन्यांची उत्पादने ठेवण्यासाठी या पार्कचा उपयोग होतो. पार्कमध्ये फ्रेट स्टेशन, साठवणूक, वितरण, उत्पादनांचे ग्रेडिंग, कार्गो अशा सुविधा मिळतात. लॉजिस्टिक हबमध्ये ट्रक टर्मिनल्स, कूलिंग प्लाण्ट, वर्कशॉप, होलसेल मॉल चेन तयार केली जाईल. त्यामुळे शहरात होणारी वाहतूक आपोआपच कमी होईल. परिणामी शहरातील प्रदूषणाचे प्रमाणही कमी होण्यास मदत होणार आहे.

नाशिकच्या औद्योगिक क्षेत्रात झपाटयाने वाढ होत आहे. त्यामुळे उद्योगांची आवश्यकता लक्षात घेउन महिंद्रा लॉजिस्टिक लिमिटेडने एक सकारात्मक पाऊल उचलले आहे. यामुळे स्थानिक पातळीवर उद्योगवाढीच्या दृष्टीने निश्चित चालना मिळेल. : गणेश कोठावदे, उपाध्यक्ष एबीबी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -