घरक्राइमRaigad liquor Crime : रायगडमधील हातभट्टीचालकांचे धाबे दणाणले

Raigad liquor Crime : रायगडमधील हातभट्टीचालकांचे धाबे दणाणले

Subscribe

हातभट्टी दारू निर्मितीच्या ९ धंद्यावर छापे. पोलीस आणि उत्पादन शुल्क यांनी ही संयुक्त कारवाई खालापूर, पेण, कर्जत, रोहा, मुरुडमध्ये केली.

खालापूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगड पोलिसांनी हातभट्टी दारू निर्मितीच्या धंद्यांवर घाव टाकायला सुरुवात केली आहे. शुक्रवार आणि शनिवारी रायगड जिल्हा उत्पादक शुल्क विभाग आणि पनवेल ग्रामीण पोलीस यांनी संयुक्त कारवाई करत तब्बल ९ हातभट्टी दारूचे धंदे उद्ध्वस्त केले आहेत. या कारवाईत ८ लाख २ हजारांचा मुद्देमाल जप्त करून तिघांना ताब्यात घेतले आहे.

राज्य उत्पादन शुल्कचे रायगड अधीक्षक आर. आर. कोले यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हा उत्पादन शुल्क विभागातील निरीक्षक मुरूड आणि त्यांचा स्टाफ, पनवेल ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक आणि कर्मचारी तसेच पनवेलचे भरारी पथक क्रमांक या तिन्ही कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.

- Advertisement -

हेही वाचा… Raigad Crime News : हातभट्ट्यांवर रायगड पोलिसांची वक्रदृष्टी

त्यांनी खालापूर तालुक्यातील नावंडे डोंगर परिसर, कर्जत तालुक्यातील पळसदरी डोंगरपरिसर, माणगावच्या बेकरे गाव येथील डोंगराळ जंगलभाग, तसेच मुरूड आणि पेण तालुक्यांतील हातभट्टी निर्मितीच्या ठिकाणांवर छापे टाकून गावठी दारू निर्मितीचे अड्डे उद्ध्वस्त केले.

- Advertisement -

हेही वाचा… Pen Crime News : पेणच्या डॉक्टरला ‘या’ गुन्ह्यात एसीबीकडून अटक

या संपूर्ण कारवाईत ९ ठिकाणांवर छापे मारून हातभट्टी निर्मितीचे साहित्य, ९६ लिटर तयार गावठी दारू तसेच १७ हजार ८४० लिटर नवसागर आणि गुळ मिश्रीत रसायन असा एकूण ८ लाख २ हजार रुपयांचा मुद्देमाल तसेच तिघांना ताब्यात घेतले. काही ठिकाणी कारवाईची चाहूल लागल्याने आरोपी फरार झाले. त्यांचाविरोधात गुन्हे दाखल झाले असून पोलिसांकडून शोध सुरू आहे.

हेही वाचा… Alibaug Raigad Crime : विवाहबाह्य संबंधांसाठी आईकडूनच दोन चिमुरड्यांची हत्या

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -