घरदेश-विदेशदिल्लीत एका शाळेतील 14 मुलांना कोरोनाची लागण, सरकारच्या शाळांना 'या' सूचना

दिल्लीत एका शाळेतील 14 मुलांना कोरोनाची लागण, सरकारच्या शाळांना ‘या’ सूचना

Subscribe

मुंबईसह देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून, अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मात्र असं असलं तरी दिल्लीत अद्याप कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याचं समोर येत आहे. दिल्लीतील एका खाजगी शाळेत विद्यार्थी आणि शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर एकूण 14 मुलांना लागण झाली आहे.

मुंबईसह देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून, अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मात्र असं असलं तरी दिल्लीत अद्याप कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याचं समोर येत आहे. दिल्लीतील एका खाजगी शाळेत विद्यार्थी आणि शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर एकूण 14 मुलांना लागण झाली आहे. या सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यापैकी अनेकांना एकापेक्षा जास्त रोग असल्याचं समजतं. खासगी आणि सरकारी रुग्णालयात एकूण 14 कोरोना पॉझिटीव्ह मुले दाखल आहेत. कोरोनाच्या घटत्या प्रकरणानंतर शाळांमध्ये 1 एप्रिलपासून पूर्णपणे ऑफलाइन काम सुरू करण्यात आलं होतं.

- Advertisement -

दरम्यान, या विद्यार्थ्यांना झालेली कोरोनाची लागण लक्षात घेता दिल्ली सरकारनं राष्ट्रीय राजधानीतील शाळांसाठी एक नवीन मार्गदर्शक तत्त्वं जाहीर केली आहेत. ज्यामध्ये शाळांना सूचना दिल्या आहेत की जर एखादा विद्यार्थी किंवा कर्मचारी चाचणीत कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यास, संपूर्ण कॅम्पस किंवा ती विंग तात्पुरती बंद करावी.

“विद्यार्थी आणि शिक्षकांनी कोरोना प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे, ज्यामध्ये सोशल डिस्टंसिंग ठेवणे, हात स्वच्छ करणे, मास्क घालणे इत्यादींचा समावेश आहे. मात्र, दिल्लीस्थित एका डॉक्टरने शिक्षक आणि विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आढळल्यानंतर शाळा बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे”, असं मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करताना सरकारनं म्हटलं.

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रीय राजधानी दिल्लीत कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. शुक्रवारी हेल्थ बुलेटिनमध्ये दिल्लीत गेल्या 24 तासांत पॉझिटिव्ह दर 3.95 टक्के असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच, 366 कोरोनाची प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत.


हेही वाचा – न्यायव्यवस्थेवर ताण, प्रलंबित प्रकरणं मोठी समस्या; मुख्य न्यायाधीशांनी व्यक्त केली चिंता

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -