घरदेश-विदेशतामिळनाडूतील 'त्या' मंदिरातील मूर्ती देवाची नव्हे बुद्धांची, हायकोर्टाकडून ताबा पुरातत्व विभागाकडे

तामिळनाडूतील ‘त्या’ मंदिरातील मूर्ती देवाची नव्हे बुद्धांची, हायकोर्टाकडून ताबा पुरातत्व विभागाकडे

Subscribe

चेन्नई : तामिळनाडूतील एका हिंदू मंदिरातील मूर्ती भगवान बुद्धांची असल्याने तिथे पूजाअर्चा करण्यास मद्रास उच्च न्यायालयाने मनाई केली आहे. तसेच या मंदिराचा ताबा भारतीय पुरातत्व विभागाकडे सोपविला.

तामिळनाडू सरकारच्या हिंदू धार्मिक आणि धर्मादाय संस्थेच्या अखत्यारित सेलम जिल्ह्यातील तलैवेट्टी मुनियप्पन मंदिर आहे. या मंदिराबाबत एका बौद्ध ट्रस्टने याचिका दाखल केली होती. मंदिरात बुद्धाची मूर्ती असूनही, तिचे तलैवेट्टी मुनियप्पन या हिंदू देवतेची पूजा केली जात आहे, असा आक्षेप या याचिकेतून घेण्यात आला होता. या वादातील मधला मार्ग म्हणून न्यायालयाने पुरातत्व विभागाचे प्रधान सचिव आणइ आयुक्तांकडून याबाबतचा अहवाल मागवला होता.

- Advertisement -

हेही वाचा – येस बँक-डीएचएफएल गैरव्यवहार : अविनाश भोसले, संजय छाब्रियाच्या ४१५ कोटींच्या मालमत्तेवर ईडीची टाच

त्यानुसार या मूर्तीचे निरीक्षण करून आपला अहवाल भारतीय पुरातत्व विभागाने न्यायालयात सादर केला होता. ही मूर्ती बुद्धाची असल्याचे त्यांनी या अहवाल म्हटले आहे. त्यामुळे पुरातत्व विभागाच्या निष्कर्षानंतर चुकीची ओळख पुढे चालू ठेवता येणार नाही, असा निर्वाळा, न्यायमूर्ती एन. आनंद व्यंकटेश यांनी दिला. तसेच हे मंदिर आता हिंदू धार्मिक आणि धर्मादाय संस्थेकडे न ठेवता पुरातत्व विभागाच्या ताब्यात देण्याचा निर्णय न्यायालयाने दिला.

- Advertisement -

फलक लावण्याची सूचना
या मंदिर परिसरात ही मूर्ती भगावन बुद्धाची असल्याचा फलक लावण्याची सूचना न्यायालयाने केली. याच्या दर्शनाची अनुमती नागरिकांना देता येईल, पण या मूर्तीची पूजा किंवा अन्य विधी केले जाणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

हेही वाचा – ठाण्यात दहीहंडी उत्सवासाठी लाखोंची बक्षिसे, गोविंदा मंडळांमध्ये मोठी चुरस

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -