दिल्लीत गोदामाची भिंत कोसळून सहा जणांचा मृत्यू, अनेक कामगार दबल्याची शक्यता

अनेकजण या भिंतीच्या मलब्याखाली अडकल्याची भिती व्यक्त केली जातेय. दरम्यान, पोलीस आणि अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.

दिल्लीच्या अलीपूर येथे आज भीषण दुर्घटना घडली. निर्माणाधीन असलेल्या गोदामाची भिंत कोसळून ६ कामगारांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, अनेकजण या भिंतीच्या मलब्याखाली अडकल्याची भिती व्यक्त केली जातेय. दरम्यान, पोलीस आणि अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. (Alipur Godown Wall Collapses Many Died And Trapped)

हेही वाचा – वसईत दरड कोसळली; दोन जणांचा मृत्यू, एनडीआरएफ दाखल, चार जण बचावले

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुर्घटना घडली त्याठिकाणी २५ पेक्षा जास्त कामगार काम करत होते. भिंत कोसळल्याने ६ कामगारांचा जागीच मृत्यू झाला. तर, मलब्याखालून १४ कामगारांना काढण्यात यश आलं आहे. तर, अनेकजण अडकल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या रवाना झाल्या आणि बचावकार्य सुरू करण्यात आले.

हेही वाचा – विक्रोळीत पंचशील नगर येथे घरांवर कोसळली दरड, बचावकार्य सुरू

दरम्यान, १४ कामगारांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून ७ जण किरकोळ जखमी झाले आहेत. तसेच, दोघेजण गंभीर जखमी आहेत. बचावकार्य अद्यापही सुरू असून अडकलेल्यांना मजुरांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे.