घरअर्थजगतजुलै महिन्यात बँका १४ दिवस बंद राहणार, महत्त्वाची कामं वेळेत पूर्ण...

जुलै महिन्यात बँका १४ दिवस बंद राहणार, महत्त्वाची कामं वेळेत पूर्ण करा

Subscribe

रोजच्या व्यवहारात आपण खूप वेळा पैसे देण्यासाठी किंवा बिल भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीचा वापर करतो. आतापासूनच तुमची महत्वाची बँकेची कामं पूर्ण करायला लागा. जुलै मध्ये १४ दिवस बँका बंद असणार आहेत.

आपल्या रोजच्या व्यवहारात आपण खूप वेळा पैसे देण्यासाठी किंवा बिल भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीचा वापर करतो. कोव्हीड नंतर तर ऑनलाईन पेमेंट(Online Payment) करणाऱ्यांमध्ये अधिकच वाढ झाली. पण असं असूनही काही जण अजूनही बँकेवर डिपेंड आहेत. किंवा काही जण अजूनही व्यवहारात कॅशचा वापर करतात. तर काहींची महत्वाची कामं ही बँकेतच होतात. या सगळ्यांसाठीच ही बातमी महत्वाची आहे. तुमची बँकेची काही महत्वाची कामं असतील तर ती वेळीच पूर्ण करा. किंवा आतापासूनच तुमची महत्वाची बँकेची कामं पूर्ण करायला लागा. कारण पुढल्या महिन्यात म्हणजेच जुलै मध्ये १४ दिवस बँका बंद असणार आहेत.

 

- Advertisement -

हे ही वाचा – डेबिट-क्रेडिट कार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी, १ जुलैपासून बदलणार नियम

जुलै महिन्यात बँका १४ दिवस बंद असणार आहेत. भारत देशात विविध सण आणि उत्सव मोठया प्रमाणात साजरे केले जातात. प्रत्येक राज्याची एक वेगळी संस्कृती आहे त्यानुसार प्रत्येक राज्यात तिथल्या सणा-वारानुसार बँकांना सुट्या देण्यात आल्या आहेत. ‘भारतीय रिझर्व्ह बँकेने'(Reserve Bank of India) या सगळ्या सुट्यांचं एक कॅलेंडर जाहीर केलं आहे. त्या कॅलेंडर प्रमाणे कोणत्या दिवशी बँका बंद असणार आहेत ते जाणून घेऊ.

- Advertisement -

१ जुलै – कांग (रथजत्रा)/ रथ यात्रा – भुवनेश्वर आणि इंफाळ बँक बंद असणार आहे

३ जुलै – रविवार

७ जुलै – खर्ची पूजा – अगरळा बँक बंद

९ जुलै – महिन्याचा दुसरा शनिवार

१० जुलै – रविवार

११ जुलै – ईज- उल- अजा – जम्मू आणि श्रीनगर बँक बंद

१३ जुलै – भानू जयंती – गंगटोक बँक बंद

१४ जुलै – बेन डिएनखलाम – शिलॉंग बँक बंद

१६ जुलै – हरेला – डेहरादून बँक बंद

१७ जुलै – रविवार

२३ जुलै – महिन्याचा चौथा शनिवार

२४ जुलै – रविवार

२६ जुलै – केर पूजा – अगरळा बँक बंद

३१ जुलै – रविवार

हे ही वाचा – स्वस्तात सोने खरेदीची सुवर्णसंधी, गोल्ड बाँड योजना २० जूनपासून सुरू

रिझर्व्ह बँक एक कॅलेंडर जारी करते. यामध्ये बँकेच्या सुट्टयांसंदर्भात महत्वाची माहिती असते. दुसरा आणि चौथा शनिवार त्याचबरोबर रविवार सोडल्यास इतर कोणत्या दिवशी कोणत्या राज्यात बँका बंद रुजणार आहेत या संदर्भातील माहिती या कॅलेंडर मध्ये देण्यात आलेली असते.

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -