घरदेश-विदेशविधानसभा निवडणुकीआधीच भास्कर राव भाजपामध्ये, 'आप'ला कर्नाटकमध्ये मोठा धक्का

विधानसभा निवडणुकीआधीच भास्कर राव भाजपामध्ये, ‘आप’ला कर्नाटकमध्ये मोठा धक्का

Subscribe

बंगळुरू : कर्नाटकमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या आधीच आम आदमी पार्टीला मोठा धक्का बसला आहे. बंगळुरूचे माजी पोलीस आयुक्त आणि आम आदमी पार्टीचे नेते भास्कर राव यांनी पक्षाला रामराम ठोकत राज्यातील सत्ताधारी भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.

भास्कर राव यांनी आज, १ मार्चला भाजपाचे सदस्यत्व घेतले. यावेळी त्यांच्यासोबत भाजपा प्रदेश अध्यक्ष नलिन कुमार कटील सुद्धा होते. पत्रकारांना संबोधित करताना भास्कर राव यांनी आम आदमी पार्टीवर निशाणा साधला. त्यांनी म्हटले की, आम आदमी पार्टीत पारदर्शकतेचा अभाव आहे. आम आदमी पार्टी बहुराष्ट्रीय कंपनीप्रमाणे चालवली जाते आणि भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्याच्या नावाखाली लोकांकडून निधी गोळा केला जातो.

- Advertisement -

हेही वाचा – मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात चाललंय काय? शिवसेनेच्या उपविभाग प्रमुखाची भररस्त्यात हत्या

आपच्या मंत्र्यांनी जेलमध्ये जाणे लज्जास्पद
आम आदमी पार्टीचा आता विकास होऊ शकत नाही. संपूर्ण पक्ष एका नेत्यांच्या हाती आहे आणि पक्षात स्पष्टतेचा अभाव आहे, असे सांगून भास्कर राव म्हणाले की, आपच्या दोन मंत्र्यांचे जेल जाणे लज्जास्पद आहे. सीबीआयने नुकतेच दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना 2021मध्ये आणलेल्या मद्य धोरणाच्या कथित घोटाळ्याच्या आरोपाखाली अटक केली आहे, तर मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात माजी आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन जेलमध्ये आहेत.

- Advertisement -

पंतप्रधान मोदींपासून प्रेरित
पंतप्रधान मोदींपासून आपण खूप प्रेरित आहेत. पंतप्रधानांची कामे पाहून भाजपात प्रवेश केला. मी भाजपात अधिक योगदान देऊ शकतो, याची मला खात्री आहे. पंतप्रधानांच्या दूरदृष्टीने मला पक्षात येण्याची प्रेरणा दिली, असे ते म्हणाले.

११ महिन्यांपूर्वीच आपमध्ये घेतला होता प्रवेश
भास्कर राव यांनी ११ महिन्यांपूर्वीच ४ एप्रिलला आपमध्ये प्रवेश केला होता. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भास्कर राव यांना पक्षाचे सदस्यत्वपद दिले होते. भास्कर राव यांच्या पक्ष सोडण्याने आपला मोठा धक्का बसल्याचे सांगितले जात आहे.

हेही वाचा – सत्तेत आल्यास पाकिस्तानची आर्थिक मदत बंद, अमेरिकेच्या निक्की हेलींची भूमिका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -