घरदेश-विदेश२८ सप्टेंबरला देशभरातले मेडिकल राहणार बंद!

२८ सप्टेंबरला देशभरातले मेडिकल राहणार बंद!

Subscribe

येत्या २८ सप्टेंबरला राज्यातील औषध विक्रेते देशव्यापी संपावर जाणार आहेत. औषध विक्रीसाठी ई-फार्मसीचा ठोस मसुदा तयार करण्यात आला आहे. पण, या मसुद्यात औषध विक्रेत्यांचा विचार करण्यात आला नसल्याचं सांगत याच जाहीर मसुद्याविरोधात २८ सप्टेंबरपासून देशव्यापी संप पुकारण्यात आला असल्याचे राष्ट्रीय औषध विक्रेत्या संघटनांनी स्पष्ट केले आहे.

येत्या २८ सप्टेंबरला औषध विक्रेते देशव्यापी संपावर जाणार आहेत. औषध विक्रीसाठी ई-फार्मसीचा ठोस मसुदा तयार करण्यात आला आहे. पण, या मसुद्यात औषध विक्रेत्यांचा विचार करण्यात आला नसल्याचं सांगत याच जाहीर मसुद्याविरोधात २८ सप्टेंबरपासून देशव्यापी संप पुकारण्यात आला असल्याचे राष्ट्रीय औषध विक्रेत्या संघटनांनी स्पष्ट केले आहे. मात्र देशभरात जरी संप पुकारण्यात आला असला, तरी महाराष्ट्रात मात्र शर्टवर काळ्या फिती लावून औषध दुकानांमध्ये कर्मचारी काम करतील, असे राज्यातील औषध विक्रेत्यांकडून सांगण्यात आले आहे.

देशातली ८ लाख दुकाने पाळणार बंद

दरम्यान, देशातील ८ लाख औषध दुकाने या दिवशी बंद पाळणार आहेत. औषधांच्या किंमतीत सवलत देत औषधे ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी ऑनलाइन कंपन्यांच्या माध्यमातून ई-फार्मसी सुरू करण्यात आली. ई-फार्मसीमुळे औषधे सहज उपलब्ध होऊ शकतात. याचा परिणाम लोकांच्या आरोग्यावर होऊ शकतो, असा आक्षेप औषध विक्रेत्यांनी घेतला आहे. त्यामुळे सरकारच्या या धोरणाला विरोध करण्यासाठी औषध विक्रेत्यांसह फार्मासिस्टनीही ठाम भूमिका घेण्याच्या दृष्टीने हा संप पुकारला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ऑनलाईन औषध विक्रीविरोधात एफडीएवर मोर्चा


का जाणार संपावर?

ई-फार्मसीच्या प्रस्तावित मसुद्यामध्ये रुग्णहिताचा विचार करण्यात आलेला नाही. डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शननेच औषधे देण्यात यावीत, अशी मागणी औषध विक्रेत्यांनी लावून धरली आहे. देशात आणि राज्यात बेकायदेशीररीत्या इंटरनेट फार्मसीच्या माध्यमातून ऑनलाईन औषध विक्रीला विरोध करण्यासाठी आणि भारत सरकारने परवानगी देण्यासाठी नुकताच ई- फार्मसीचा मसुदा जाहीर केला. त्याचा विरोध करण्यासाठी हा संप पुकारण्यात आला आहे.

- Advertisement -

फार्मासिस्टच्या दर्जासाठीही निषेध

दरम्यान, औषध विक्रेत्या संघटनांनी २०१३ सालापासून आजपर्यंत ‘औषध दुकानात काम करणाऱ्या अशिक्षित व्यक्तींना पाच वर्षे अनुभव असल्यास फर्मासिस्ट्सचा दर्जा द्या’, अशी मागणी २८ सप्टेंबर २०१८ च्या संपात केल्यामुळे २१ सप्टेंबर २०१८ पासून ते २७ सप्टेंबर पर्यंत मालक फर्मासिस्ट आपल्या शर्टावर काळ्या फिती लावून औषध दुकानात काम करणार असल्याचे महाराष्ट्र रजिस्टर्ड फर्मासिस्टस असोसिएशनचे अध्यक्ष कैलास तांदळे यांनी स्पष्ट केलं आहे.


तुम्ही हे वाचलंत का? – जेनेरिक औषधांचा डॉक्टर आणि मेडिकल स्टोअर्सना नॉशिया!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -