Friday, June 25, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी Live Update: दहावीच्या निकालाची कार्यपद्धती जाहीर

Live Update: दहावीच्या निकालाची कार्यपद्धती जाहीर

Related Story

- Advertisement -

राज्य मंडळाने दहावीचा निकाल करण्यासंदर्भातील कार्यपद्धती जाहीर केली. यामध्ये नववीचा अंतिम निकाल, दहावीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन व दहावीचे अंतिम तोंडी/प्रात्यक्षिक/अंतर्गत मूल्यमापन इत्यादींच्या आधारे विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुणदान करण्यात येणार आहे. त्यानुसार इयत्ता नववीतील १०० पैकी ५० गुण, तर दहावीतील ८० पैकी ३० गुण ग्राह्य धरण्यात येणार आहेत. (सविस्तर वाचा)


हवामान खात्याने पुढील २४ तासांत मुंबईत ढगांच्या गडगडाटासह मध्यम, जोरदार तर काही ठिकाणी अति जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. गुरुवारी दुपारी १२.१७ वाजता समुद्रात मोठी भरती असून समुद्रात ४.२६ मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. तर सायंकाळी ६.१४ वाजता ओहोटी असून त्यावेळी समुद्रातील लाटांची उंची १.९४ मिटर इतकी असणार आहे. (सविस्तर वाचा)


- Advertisement -

मुंबईत बुधवारी ७८८ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर २७ जणांचा मृत्यू झालाय. मुंबईच्या मृत्यूसंख्येत आज वाढ झालीय. तर ५११ जणांनी आज कोरोनावर मात केली आहे. (सविस्तर वाचा )


- Advertisement -

राज्यात गेल्या २४ तासात १०,९८९ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर राज्यात आज १६,३७९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आज २६१ बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. (सविस्तर वाचा ) 


 

Covaxin लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल डेटा जुलै महिन्यात समोर येणार असल्याची माहिती भारत बायोटेकने दिली आहे.


मुंबईत बुधवारी पहाटेपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे मिठी नदी ओव्हरफ्लो झाली आहे. मिठी नदीचे पाणी कुर्ला परिसरात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. इमारतींच्या तळमजल्यापर्यंत पाणी शिरले आहे. दरवर्षी पावसाळ्यात मिठी नदीचे पाणी इमारतीत शिरले असे इथल्या स्थानिकांचे म्हणणे आहे.


 

हवामान खात्याकडून  मुंबई,ठाणे,पालघरला आज रेड अलर्ट तर पुढील ४ दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.


मुंबईला हवामान खात्याकडून आज रेड अलर्ट तर पुढील ४ दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुंबई महानगपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी महानगरपालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी पावसामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि विविध उपाययोजनांची त्यांना माहिती दिली.


रत्नागिरी जिल्ह्यात ९ जून ते १३ जून या कालावधीत मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे भारतीय हवामान खात्यातर्फे जारी करण्यात आलेल्या ताज्या बातमीपत्रानुसार या सर्व कालावधीत रत्नागिरीसह लगतच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे या कालावधीत सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता असून सोबतच मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.


राज्याचे माननीय मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईतील जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील आपत्कालीन नियंत्रण कक्षास आज दुपारी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. याप्रसंगी महानगरपालिकेच्या सभागृह नेता विशाखा राऊत, स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव, महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी, सह आयुक्त (महानगरपालिका आयुक्त कार्यालय) चंद्रशेखर चोरे, उपायुक्त (आपत्कालीन व्यवस्थापन) प्रभात रहांगदले, संचालक (आपत्ती व्यवस्थापन) महेश नार्वेकर हे उपस्थित होते.


मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज बृहन्मुंबई महापालिका मुख्यालयातील आपत्कालीन नियंत्रण कक्षाला भेट देऊन मुंबईतील एकूण पाऊस आणि सद्यस्थिती जाणून घेतली. याप्रसंगी अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) अश्विनी भिडे उपस्थित होत्या.


मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि आयुक्त इक्बाल चहल पावसाच्या स्थितीची पाहणी करत आहेत. अंधेरी सब-वे चार महिन्यांसाठी बंद करण्यात येणार आहे, अशी माहिती आयुक्तांनी दिली आहे.


काँग्रेसचे नेते जितिन प्रसाद यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थिती भाजपमध्ये प्रवेश केला.


मुंबईत एका तासात ६० मिमीपेक्षा जास्त पाऊस – आयुक्त इक्बाल चहल

दहिसर, चुना-भट्टी, सायन भागात पाणी साचल्याची आयुक्तांनी दिली माहिती


मुंबईत पहिल्याच पावसात रस्ते, रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे प्रवाशांचे हाल झाले.


ठाणे ते सीएसएमटी लोकल सेवा ठप्प


सायन, कुर्ला रेल्वे स्थानकात पाणी भरलं आहे. मध्य रेल्वेची मुंबईच्या दिशेने जाणारी लोकल वाहतूक पुढील सूचना येईपर्यंत बंद ठेवली जाणार आहे. कुर्ला ते सीएसएमटी स्थानकादरम्यानची अप दिशेची वाहतूक बंद करण्यात आली आहे.


पहिल्याच पावसात मुंबईत पाणी साचलं आहे. यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे.


मुसळधार पावसामुळे मुंबईतील गांधी मार्केटमध्ये वाहने पाण्याखाी


राष्ट्रवादी सर्वेसर्व शरद पवार आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. आज दुपारी १२ वाजता सिल्व्हर ओक म्हणजे शरद पवार यांच्या निवासस्थानी बैठक होणार आहे. यामध्ये केंद्रीय कृषी कायद्यासंदर्भात चर्चा केली जाणार आहे.


मुंबई हायजवळ P305 बार्ज आणि वरप्रदा बुडून ८६ कर्मचारी प्राणास मुकले आहेत. त्यांची कुटुंब उद्धवस्त झाली आहे. ओएनजीसी आणि अॅफकॉन्स कंपनी जबाबदार असून त्यांनी कामगार कर्मचारी यांना सर्व प्रकारे भरपाई मिळावी म्हणून आज वांद्र येथे मोर्चा काढण्यात येणार आहे.

बुडून मृत्यू पावलेल्या कर्मचारी कुटुंबांचे कामगार संघटनेचा आज मोर्चा असणार आहे. ओएनजिसी, कंत्राटदार् कंपनी च्या कार्यालय वर धडकनारणार मोर्चा आहे.

युनियनचा वतीने आज ओएनजीसी मुख्य कार्यालय, वसुंधरा बिल्डिंग, वांद्रे (पूर्व) येथे दुपारी ३:३० वाजता निदर्शन करणार आहेत. या आंदोलनचे नेतृत्व,राष्ट्रीय कामगार नेते डॉ.डी.एल.कराड करणार आहेत. तसेच सीआयटीयु, महाराष्ट्र ,मुंबई कमिटीचे प्रमुख नेते, कार्यकर्ते आणि मृत्यू पावलेल्या कुटुंबांतील व्यक्ती सहभागी होणार आहेत.


रायगड, रत्नागिरीला ऑरेज अलर्ट


काही तासांनंतर मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचलं आहे.

किंग्ज सर्कल आणि सायनमध्ये पाणी साचलं

सायनमधील दृश्य


मुंबईत काल रात्रीपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. सकाळपर्यंत मुंबईल पावसाने झोडपले आहे. अजूनही मुंबईत मुसळधार पाऊस आहे. अंधेरी, गोरेगाव, मालाड, जोगेश्वरीत मुसळधार पाऊस असून मुलुंड, भांडुप, घाटकोपर परिसरात पावसाची संततधार आहे. काही तासात मुंबईत मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.


मुंबईत पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. तसेच ठाणे, कल्याण-डोंबिवली येथे देखील पावसाने हजेरी लावली आहे. ९ ते १२ जूनदरम्यान मुंबईत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. शिवाय कोकणातील काही जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला गेला आहे.


इंधन दरवाढी विरोधात काँग्रेस ११ जूनला देशभरात पेट्रोलपंपच्या समोर देशव्यापी आंदोलन करणार आहे.


जगभरात कोरोना व्हायरसचा कहर कायम आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत जगभरात १७ कोटी ४७ लाखांहून अधिक कोरोनाबाधित आढळले आहेत. यापैकी आतापर्यंत ३७ लाख ६२ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तर १५ कोटी ८१ लाखांहून अधिक जण बरे होऊन घरी गेले आहेत.


राज्यात मंगळवारी १० हजार ८९१ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर सोमवारी करण्यात आलेल्या मृत्यूंच्या संख्येच्या तुलनेत बळींच्या संख्येत वाढ होऊन २९५ इतकी झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर १.७३% एवढा आहे. सविस्तर वाचा 


मुंबईत काल,मंगळवारी केवळ ७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (Mumbai Corona Update: Mumbai Today Only 7 corona death in mumbai)  सोमवारी हिच संख्या २७ इतकी होती. मुंबईत आतापर्यंत नोंदवण्यात आलेली ही सर्वात कमी मृत्यूंची नोंद आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी ही अत्यंत दिलासादायक बाब आहे. सविस्तर वाचा 

- Advertisement -