घरताज्या घडामोडीNew Corona Varient : कोरोनाचा नवीन XE व्हेरियंट Omicron BA.2 पेक्षा १०...

New Corona Varient : कोरोनाचा नवीन XE व्हेरियंट Omicron BA.2 पेक्षा १० पटीने धोकादायक, WHO चा दावा

Subscribe

कोरोना विषाणूचा पुन्हा एकदा नवीन प्रकार आढळून आला आहे. XE हा नवीन व्हेरियंट Omicron BA.2 पेक्षा जास्त पटीने संसर्गजन्य आणि धोकादायक असल्याचा दावा जागतिक आरोग्य संघटनेकडून करण्यात आला आहे. XE हा व्हेरियंट ओमिक्रॉनच्या BA.1 आणि BA.2 या दोन व्हेरियंटनचा रीकॉम्बिनेंट स्ट्रेन आहे.

WHO ने दिलेल्या माहितीनुसार, जोपर्यंत या व्हेरियंटचा ट्रान्समिशन रेट आणि आरोग्याच्या वर्तनात बदलाव येत नाही. तोपर्यंत हा व्हेरियंट ओमिक्रॉनशी जोडलेला पहायला मिळेल. BA.2 च्या तुलनेत नवीन व्हेरियंटचं संक्रमण दहा पटीने जास्त असल्याचे सूचित करण्यात आले आहे. मात्र, या व्हेरियंटची माहिती आकड्यांनुसार काढली जाणार आहे. BA.2 हा व्हेरियंट संपूर्ण जगासाठी चिंतेचा विषय बनला आहे. सीक्वेस्ड प्रकरणांची संख्या जवळपास ८६ टक्के इतकी आहे. XE हा स्ट्रेन पहिल्यांदा १९ जानेवारी रोजी यूकेमध्ये आढळून आला होता आणि तेव्हापासून ६०० हून अधिक XE प्रकरणांची माहिती समोर येत आहे.

- Advertisement -

XE सारख्या रीकॉम्बिनंट प्रकारांच्या व्हेरियंटचे निरीक्षण सातत्याने करण्यात येणार आहे, असं डब्ल्यूएचओने म्हटलं आहे. XE सारख्या व्हेरियंट व्यतिरिक्त XD या व्हेरियंटवर सुद्धा नरज ठेवण्यात येणार आहे. XD हा व्हेरियंट सुद्धा डेल्टा आणि ओमिक्रॉनचा एक हायब्रिड आहे. या प्रकरणांतील अधिकतर रूग्ण डेनमार्क आणि बेल्जियम मध्ये आढळून येतात. त्यामुळे एक्सडी हा व्हेरियंट एक्सई पेक्षा अधिक धोकादायक नाहीये, असं डब्ल्यूएचओने म्हटले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने मांडलेल्या माहितीनुसार जागतिक पातळीवर लस घेतलेल्या व्यक्तींमध्ये काही अंशी लोकांमध्ये कमी एकू येण्याचा दोष आढळून आला आहे. पण ही टक्केवारी खूपच कमी आहे. ज्या व्यक्तींनी फायझर बायोटेकचा डोस घेतला आहे, अशा व्यक्तींमध्ये हा दोष आढळला आहे. एकुण ११ अब्ज डोस हे जागतिक पातळीवर वितरीत करण्यात आले होते. आतापर्यंत एकुण ३६७ प्रकरणे अशी आढळली आहेत, ज्या व्यक्तींनी कमी एकू येण्याचा दोष आढळला आहे. या व्यक्तींना एकण्यााच्या बाबतीत अनेक दोष आढळले आहेत

- Advertisement -

हेही वाचा : Next Pandemic Warning: कोरोनानंतर ‘या’ आजारामुळे येणार पुढील महामारी, WHOचा इशारा


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -