घरक्राइमकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दुसऱ्यांदा जीवे मारण्याच्या धमकीचा फोन; पोलीस सतर्क

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दुसऱ्यांदा जीवे मारण्याच्या धमकीचा फोन; पोलीस सतर्क

Subscribe

नितीन गडकरी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी जीवे मारण्याच्या धमकीचा फोन आल्याचे समजते. सोमवारी संध्याकाळा सुमारास हा फोन आला होता. याबाबत नितीन गडकरी यांच्या कार्यालयाने दिल्ली पोलिसांना माहिती दिली.

मागील महिन्यात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा नितीन गडकरी यांना जीवे मारण्याच्या धमकीचा फोन आल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. (Death Threat To Union Minister Nitin Gadkari Again Delhi Police On Alert)

मिळालेल्या माहितीनुसार, नितीन गडकरी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी जीवे मारण्याच्या धमकीचा फोन आल्याचे समजते. सोमवारी संध्याकाळा सुमारास हा फोन आला होता. याबाबत नितीन गडकरी यांच्या कार्यालयाने दिल्ली पोलिसांना माहिती दिली. विशेष म्हणजे नागपूर पोलिसांनी (Nagpur Police) सावध पवित्रा घेत नितीन गडकरी यांच्या नागपुरातील निवासस्थानी आणि त्यांच्या संपर्क कार्यालयाच्या सुरक्षेत वाढ केली आहे. गडकरी यांच्या निवासस्थानी बॉम्बशोधक नाशक पथक तसेच सशस्त्र पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – लोकसभा निवडणुकीसाठी मविआच्या फॉर्म्युल्याबाबत जयंत पाटील यांनी दिली माहिती; म्हणाले…

गडकरींच्या कार्यालयातून मिळालेल्या माहितीच्याआधारे दिल्ली पोलीस सतर्क झाले असून, या प्रकरणाच्या अधिक तपासाला सुरूवात केली आहे. दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी आलेल्या जीवे मारण्याच्या धमकीच्या फोनची माहिती त्यांच्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांना दिली होती. त्यानंतर घटनेची पडताळणी केली जात असून, तपास सुरू आहे.

- Advertisement -

बॉम्बस्फोट करण्याची धमकी

नितीन गडकरी यांना यापूर्वी कर्नाटक मधील बेळगाव जिल्हा कारागृहातील जन्मठेपेचा आरोपी जयेश पुजारी याने १०० कोटी रुपयांची खंडणी मागून बॉम्बस्फोट करण्याची धमकी दिली होती. या प्रकरणात नागपूर पोलिसांनी जयेश पुजारी याला अटक करून त्याच्यावर य एपीए कायद्या अंतर्गत कारवाई केली आहे. सध्या जयेश हा एनआयए पथकाच्या ताब्यात आहे.


हेही वाचा – परमवीर सिंग यांनी सरकार पाडण्यासाठी केलेल्या मदतीची…; पटोलेंचा सरकारवर गंभीर आरोप

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -