घरदेश-विदेशKarnataka Election : देवेंद्र फडणवीसांची राष्ट्रवादीवर टीका; म्हणाले, "हा पक्ष काय डोंबलं...

Karnataka Election : देवेंद्र फडणवीसांची राष्ट्रवादीवर टीका; म्हणाले, “हा पक्ष काय डोंबलं करणार?”

Subscribe

देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा कर्नाटकात जाऊन भाजपच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार केला. तर निपाणीतील एका भाषणांत त्यांनी थेट राष्ट्रवादीच्या जखमेवर मीठ चोळत पक्षावर टीका केली.

कर्नाटक राज्यात विधानसभा निवडणुकांचे बिगूल वाजल्यापासून राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासहित राहुल गांधी, प्रियंका गांधी यांनी प्रचाराला हजेरी लावली. या निवडणुकांच्या प्रचाराचा आज (ता. 08 मे) शेवटचा दिवस आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार करण्यात येत आहे. भाजपने तर कर्नाटकात भाजपचे कमळ फुलविण्यासाठी संपूर्ण ताकद पणाला लावलेली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा कर्नाटकात जाऊन भाजपच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार केला. तर निपाणीतील एका भाषणांत त्यांनी थेट राष्ट्रवादीच्या जखमेवर मीठ चोळत पक्षावर टीका केली. महाराष्ट्रात साडेतीन जिल्ह्यांचा एक पक्ष आहे. हा पक्ष काय डोंबलं करणार आहे इथे येऊन?, असे म्हणत त्यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला. (Karnataka Election Devendra Fadnavis criticizes NCP)

हेही वाचा – कर्नाटकातील प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस, दिग्गज नेत्यांच्या होणार सभा

- Advertisement -

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याचे भाजपमधील महत्त्वाचे नेते आहेत. कमी वयात राजकारणातील त्यांचा दांडगा अनुभव त्यांच्या नेहमीच कामी आलेला आहे. त्यामुळे ज्या कोणत्या राज्यात निवडणुका असतात, त्याठिकाणी देवेंद्र फडणवीस प्रचाराला हजर राहतात. नुकतंच त्यांनी कर्नाटक निवडणुकीच्या प्रतारासाठी निपाणी विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवाराच्या प्रचाराला हजेरी लावली. यावेळी त्यांनी या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी देण्यात आलेल्या उत्तम पाटील यांच्या विरोधात प्रचार करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर तोफ डागली.

या प्रचार सभेत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “महाराष्ट्रात साडेतीन जिल्ह्यांचा एक पक्ष आहे. या पक्षाने आता इथे अख्ख्या कर्नाटकमध्ये त्यांचा एक उमेदवार दिला आहे. तो उमेदवार निपाणी मतदार संघात आहे. हा पक्ष काय डोंबलं करणार आहे इथे येऊन? खरं म्हणजे ही यांची मिली जुली कुस्ती आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मिली जुली कुस्ती सुरू आहे.” अशी टीका केली. तर “राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पॅक करून पाठवून द्या, आम्ही पाहून घेऊ,” असे आवाहन देखील त्यांनी मतदारांना केले आहे.

- Advertisement -

तर याआधी एका मुलाखतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी कर्नाटका विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची सत्ता येणार, असे मत व्यक्त केले होते. याबाबत बोलताना ते म्हणाले होते की, “दिल्ली, पंजाब, उत्तराखंड, बंगालमध्ये भाजपाची सत्ता नाही. देशाचा नकाशा पाहिल्यास लक्षात येईल की, अनेक राज्यात भाजपा सत्तेवर नाही. इतर राज्यात नॉन भाजपा सरकार आहे. त्याचबरोबर आता कर्नाटकमधील स्थानिक लोक भाजपावर नाराज आहेत, त्यामुळे कर्नाटकमध्ये काँग्रेसची सत्ता येणार असं दिसतंय.”

दरम्यान, भाजपला या निवडणुकीत पराभूत करण्यासाठी काँग्रेस पक्षाकडून जोरदार प्रयत्न करण्यात येत आहे. जर का काँग्रेसने या निवडणुकीत भाजपचा पराभव केला तर यामुळे भाजपला याचा फार मोठा फटका बसू शकतो. सध्या कर्नाटकातील राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे. या विधानसभा निवडणुकीत भाजप विरुद्ध काँग्रेस ही महत्त्वाची लढत होणार आहे. पण धर्मनिरपेक्ष जनता दल अर्थात जेडीएस हा पक्ष माजी पंतप्रधान एच. देवगौडा यांच्या नेतृत्वात निवडणूक लढत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -