घरताज्या घडामोडीLive Update: UGC NET 2020 चा निकाल जाहीर

Live Update: UGC NET 2020 चा निकाल जाहीर

Subscribe
बॉलिवूडमधील अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा अखेर शिवसेनेत प्रवेश


विधानपरिषद शिक्षक पदवीधर निवडणूकीतील पहिल्या तीन तासातील मतदानाची टक्केवारी –

- Advertisement -
नागपूर पदवीधर मतदारसंघ

सकाळी 8 ते 10 या दोन तासात नागपूर ग्रामिंमध्ये 8.88% मतदान झाले.

औरंगाबाद : पदवीधर निवडणुकीसाठी मराठवाड्यात पहिल्या ३ तासात १० टक्के मतदान.

- Advertisement -

विधान परिषद निवडणूक

धुळे – नंदूरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघ : पहिल्या दोन तासात ११ टक्के मतदान पार पडले.

पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघ

कोल्हापूर – पदवीधर मतदार संघ मतदान (एकूण मतदान केंद्रे: २०५)

पुरुष पदवीधर मतदार: ६२७०९
स्त्री पदवीधर मतदार: २६८२०
एकूण पदवीधर मतदार: ८९५२९
सकाळी ८ ते १२ या कालावधीत  झालेले मतदान
पुरुष: १९८८२
स्त्रीः ५५०९
एकूण : २५३९१
मतदान टक्केवारी : २८.३६%शिक्षक मतदार संघ मतदान (एकूण मतदान केंद्रे: ७६)
पुरुष शिक्षक मतदार: ८८७९
स्त्री शिक्षक मतदार :३३५८
एकूण शिक्षक मतदार: १२२३७
सकाळी ८ ते १२ कालावधीत झालेले मतदान
पुरुष: ४१७५
स्त्रीः ११०२
एकूण : ५२७७
मतदान टक्केवारी ४३.१२%

नव्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या ५ दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर हजारोंच्या संख्येने शेतकरी जमले आहेत. मात्र हे आंदोलन जास्त चिघळू नये, म्हणून केंद्र सरकारने हालचाली सुरु केल्या आहेत. कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी शेतकऱ्यांना चर्चेसाठी बोलावलं असून आज दुपारी ३ वाजता विज्ञान भवनात सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये चर्चा होणार आहे.

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मात्र त्यांच्या शिवसेना प्रवेशावर कॉंग्रेसने अद्याप भूमिका स्पष्ट केली नाही. शिवसेना प्रवेशानंतर आज दुपारी ४ वाजता त्यांची पत्रकार परिषद देखील होणार आहे.


आज दुपारी १ वाजता मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अभिनेत्री उर्मिला मातोंडकर शिवसेनेत प्रवेश करणार.


मागील २४ तासांत देशभरात ३१ हजार ११८ नवे करोनाबाधित आढळले असून, ४८२ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता ९४ लाख ६२ हजार ८१० वर पोहचली आहे. सध्या देशभरात ४ लाख ३५ गहजार ६०३ अॅक्टिव्ह केसेस आहेत. तर, आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १ लाख ३७ हजार ६२१ वर पोहचली आहे.


राज्यातील तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघातील निवडणूक आज पार पडेल. प्रचाराच्या कालच्या शेवटच्या दिवशी सर्वच उमेदवारांनी आपापले मतदारसंघ पिंजून काढले. कालच्या रविवारी सर्वच उमेदवारांनी या निवडणुकीसाठी अखेरचा संपर्क साधला. मंगळवारी होणार्‍या मतदानासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून तीन पदवीधर आणि दोन शिक्षक आमदारकीसाठी मते पेटीबंद होतील. नागपूर, पुणे आणि औरंगाबाद पदवीधर, तर पुणे आणि अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक पार पडत आहे. येत्या ३ डिसेंबर रोजी मतमोजणी आहे.


मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुंबई फिल्म इंडस्ट्रीच्या धर्तीवर उत्तर प्रदेशमध्येही फिल्म सिटी बनवण्याची घोषणा केली होती. यासाठी त्यांच्या सरकारने नोएडामध्ये जागाही दिली असून बांधकामांचे काम वेगाने सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री योगी आज मुंबईमध्ये काही अभिनेते, दिग्दर्शक आणि चित्रपट निर्मात्यांची भेट घेणार आहेत. यात अभिनेता अक्षयकुमारचीही भेट मुख्यमंत्री योगी येणार आहेत.


विधानपरिषद शिक्षक पदवीधर निवडणुकीसाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी केले मतदान. यावेळी त्यांनी अधिकाधिक मतदान करण्याचे केलं आवाहन.


UGC NET 2020 चा निकाल जाहीर

यूजीसी नेट २०२० निकाल नुकताच जाहीर झाला असून या परिक्षेत पाच लाखाहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. हा निकाल एनटीए वेबसाइट nta.ac.in वर उपलब्ध आहे. एनटीएने २४ सप्टेंबर ते १३ नोव्हेंबर या कालावधीत यूजीसी नेट जून २०२० ची परीक्षा घेतली होती. परीक्षेसाठी नोंदणीकृत ८,६०,९७६ उमेदवारांपैकी केवळ ५,२६,७०७ परीक्षार्थीच उपस्थित राहिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -