खवय्यांसाठी बॅड न्यूज! पाणीपुरी विक्रीवर आणलीय बंदी, पण कारण काय?

पाणीपुरी केवळ भारतातच नव्हे तर इतर देशातही प्रसिद्ध आहे. परदेशी राहणाऱ्या नागरिकांना भारताचे पदार्थ खाता यावेत याकरता अनेक देशात इंडियन रेस्टॉरंटमध्ये पाणीपुरी चाखायला मिळते. त्याचप्रमाणे नेपाळमध्येही पाणीपुरी खाणाऱ्यांची संख्या कमी नाही.

take care while eating panipuri

सर्वात लोकप्रिय फास्ट फूड म्हणजे पाणीपुरी. पाणीपुरी न आवडणारा माणूस निराळाच असं समजलं जातं. पाणीपुरी खाणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने पाणीपुरीची स्टॉल्सही ठिकठिकाणी असतात. तसेच, गेल्या काही वर्षांपासून पाणीपुरीच्याही किंमती वेगाने वाढत जात आहे. मात्र, तुम्ही अस्वच्छ ठिकाणी पाणीपुरी खात असाल तर तुम्हाला कॉलरा आजार होण्याचा धोका जास्त आहे. त्यामुळे एका देशात पाणीपुरी या पदार्थावरच बंदी घालण्यात आली आहे. (Panipuri banned in nepal due to increasing in collara patients in kathmandu)

हेही वाचा – जुलै महिन्यात बँका १४ दिवस बंद राहणार, महत्त्वाची कामं वेळेत पूर्ण करा

पाणीपुरी केवळ भारतातच नव्हे तर इतर देशातही प्रसिद्ध आहे. परदेशी राहणाऱ्या नागरिकांना भारताचे पदार्थ खाता यावेत याकरता अनेक देशात इंडियन रेस्टॉरंटमध्ये पाणीपुरी चाखायला मिळते. त्याचप्रमाणे नेपाळमध्येही पाणीपुरी खाणाऱ्यांची संख्या कमी नाही. मात्र, नेपाळच्या काठमांडू शहरात कॉलराचे रुग्ण वाढल्याने ललितपूर मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये पाणीपुरीच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.

हेही वाचा तासाभरासाठी लाखभर रुपये, दिवसाचे २५-३० लाख; एकनाथ शिंदेंचे वकील हरीश साळवे का आहेत एवढे प्रसिद्ध?

पाणीपुरीत वापरण्यात येणाऱ्या पाण्यात कॉलराचे जीवाणू मोठ्या प्रमाणात आढळून आल्याचा दावा शहर प्रशासनाकडून करण्यात आला आहे. त्यामुळे, शहरातील गजबजलेल्या भागात आणि कॉरिडॉरमध्ये पाणीपुरीची विक्री बंद करण्यासाठी अंतर्गत तयारी करण्यात आली आहे.

हेही वाचा – या देशांमध्ये सैन्यदलासाठी आहे अग्निपथसारखेच नियम

काठमांडूच्या खोऱ्यात एकूण १२ रुग्णांना कॉलराची लागण झाली असल्याची माहिती काठमांडूच्या प्रशासनाने दिली आहे. कॉलरा बाधितांवर उपचार सुरू आहेत. आरोग्य आणि लोकसंख्या मंत्रालयाने लोकांना कॉलराची लक्षणे दिसल्यास तातडीने जवळच्या आरोग्य केंद्रात जाण्याचे आवाहन केले आहे. उन्हाळा आणि पावसाळ्यात अतिसार, कॉलरा आणि इतर जलजन्य रोगांचा प्रसार होत असल्याने सर्वांनी सतर्क राहण्याची विनंती मंत्रालयाने केली आहे.

हेही वाचा – वाह! क्या बात; कन्यारत्न झाल्याच्या आनंदात पाणीपुरीवाल्याने ५० हजार पाणीपुऱ्यांचे केले मोफत वाटप

कॉलरावर नियंत्रण मिळावे याकरता ठिकठिकाणी स्वच्छतेचे आवाहन करण्यात येत आहे. पावसाळ्यात संसर्गजन्य रोग लगेच पसरतात. पाण्यामार्फत संसर्गजन्य आजारांची लागण होत असते. त्यामुळे पाणी पुरीच्या विक्रीला बंदी घालण्यात आली आहे.