तासाभरासाठी लाखभर रुपये, दिवसाचे २५-३० लाख; एकनाथ शिंदेंचे वकील हरीश साळवे का आहेत एवढे प्रसिद्ध?

हरिश साळवे यांची एका तासाची फीसुद्धा लाखाच्या घरात आहे. तर, एक दिवसासाठी ते २५ ते ३० लाख आकारत असल्याचंही सांगण्यात येतंय. हरिश साळवे यांच्याबाबत असेच काही रंजक किस्से आपण पाहुयात.

harish salve

हायप्रोफाईल केस हाताळणारे ज्येष्ठ वकील हरीश साळवे आता एकनाथ शिंदे यांचं प्रकरण लढवणार आहेत. ३७ बंडखोर आमदारांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याविरोधात अविश्वासाची याचिका दाखल केली आहे. यावरून सर्वोच्च न्यायालयात हा खटला सुरू आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या बाजून हरिश साळवे खटला चालवणार आहेत. ज्यांच्यावर काँग्रेसचे संस्कार आहेत, अशा हरिश साळवे आता काँग्रेसविरोधातच म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ खटला लढवणार असल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. दरम्यान, हरिश साळवे यांची एका तासाची फीसुद्धा लाखाच्या घरात आहे. तर, एक दिवसासाठी ते २५ ते ३० लाख आकारत असल्याचंही सांगण्यात येतंय. हरिश साळवे यांच्याबाबत असेच काही रंजक किस्से आपण पाहुयात. (One lakh rupees for an hour, 25-30 lakhs a day; Why is Eknath Shinde’s lawyer Harish Salve so famous?)

हेही वाचा – बंडखोर आमदारांची सर्वोच्च न्यायालयात आज लढाई, दोन्ही बाजूंनी हायप्रोफाईल वकिलांची फौज तैनात

हरीश साळवे यांचा जन्म धुळे जिल्ह्यातील वरूड गावात झाला. त्यांनी नागपूर विद्यापीठातून एलएलबीचे शिक्षण घेतले. १९९२ साली हरीश साळवे यांची दिल्ली उच्च न्यायालयात ज्येष्ठ वकिल म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी १९९९ ते २००२ पर्यंत त्यांनी सॉलिसिटर जनरल म्हणूनही काम पाहिलं आहे. हरीश साळवे यांचे धुळे आणि नागपुरात घर असून त्यांनी वेगवेगळ्या खटल्यांमध्ये उच्च न्यायालयापासून आंतरराष्ट्रीय न्यायालयात बाजू मांडली आहे. तसंच, हरीश साळवे यांना सानिया आणि साक्षी या दोन मुली आहेत.

हेही वाचा – मोठी बातमी! राज्यातील मंत्रिमंडळात खात्यांचे फेरबदल, मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

वडिल होते काँग्रेसचे नेते

हरीश साळवे यांचे वडील एनकेपी साळवे हे विदर्भातील काँग्रेसचे बडे नेते होते. विदर्भवादी म्हणून त्यांची ओळख होती. त्यामुळे लहानपणापासूनच त्यांच्यावर काँग्रेसचे संस्कार झाले. मात्र, हरीश साळवे यांनी राजकारणाचा मार्ग पत्कारला नाही. त्यांनी वकिली निवडली आणि त्या क्षेत्रात ते यशस्वही झाले. हरीश साळवे यांचे वडील सीए असले तरी ते वकिलीसह राजकारणासोबतच क्रिकेट प्रशासकही होते. वर्ल्ड कप इंग्लडबाहेर नेण्यांच श्रेयही एनकेपी साळवे यांना जातं. त्यांच्या नावावर बीसीसीआयने १९९५ मध्ये एनकेपी साळवे ट्रॉफी स्पर्धा सुरू केली होती. तसेच, ते इंदिरा गांधी, राजीव गांधी, पी.व्ही. नरसिंह राव यांच्या सरकारमध्ये मंत्री होते. त्यावेळी त्यांनी वेगळ्या विदर्भाचाही मागणी केली होती.

हेही वाचा कुरापतखोर पाकिस्तानला जोरदार झटका

सुशिक्षित घराणं

हरीश साळवे यांच्या घरातील सर्वचजण उच्चशिक्षित आहेत. हरीश साळवे यांचे वडिल काँग्रेसचे नेते एनकेपी साळवे हे सुद्धा उच्चभ्रू वकिल होते. त्यांचे वडिल आधी सीए होते. नंतर ते वकील झाले. तसेच, त्यांचे आजोबा पी.के.साळवे प्रसिद्ध क्रिमिनल लॉयर होते. तर पणजोबा हे न्यायाधीश होते. तसेच, हरिश साळवे यांची आई पेशाने डॉक्टर होती. त्यामुळे शिक्षणाचे आणि ज्ञानाचे सर्वच उपजत गुण हरिश साळवे यांच्याकडे होते.

महागडे वकील

हरीश साळवे हे एका तासाचे लाखभर रुपये आकारतात तर, एका दिवसासाठी २५ ते ३० लाख रुपये घेत असल्याचं सांगितलं जातं. मात्र, गेल्यावर्षी कुलभूषण जाधव यांच्यासाठी त्यांनी फक्त १ रुपये मानधन तत्त्वावर काम केलं होतं.

हायप्रोफाईल केस सांभाळण्यासाठी प्रसिद्ध

  • हरीश साळवे हे हायप्रोफाईल केस सांभाळण्यासाठी प्रसिद्ध आहेत. १९७५ पासून त्यांनी आतापर्यंत सर्व हायप्रोफाईल केस सांभाळल्या आहेत. दिलीप कुमार यांच्यासाठी ते पहिल्यांदा लढले होते. १९७५ साली दिलीप कुमार यांच्यावर काळा पैसा बाळगल्याचा आरोप झाला होता. कर आणि दंड भरण्यासाठी आयकर विभागाने दिलीप कुमार यांना नोटीस पाठवली होती. त्यामुळे हे प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयाकडे गेलं होतं. याप्रकरणावर एनकेपी साळवे काम करत होते. त्यासाठी त्यांना हरीश साळवे यांनी मदत केली. अवघ्या ४५ सेकंदात आयकर विभागाने केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली होती. या प्रकरणी हरीश साळवे यांनी केलेला युक्तीवाद दिलीप कुमार यांना प्रचंड आवडला होता, असं हरीश साळवे एका मुलाखतीत म्हणाले होते.
  • हरीश साळवे यांनी अंबानी, महिंद्रा आणि टाटासारख्या प्रसिद्ध उद्योगपती यांच्याही प्रकरणात वकिली केली आहे. अंबानी बंधूंमध्ये जेव्हा वाद झाले तेव्हा हरीश साळवे यांनी मुकेश अंबानी यांच्या बाजूने लढा दिला होता. भोपाळ वायूगळतीतही युनियन कार्बाईड प्रकरणात केशव महिंद्रा यांच्यातर्फे हरीश साळवे यांनी युक्तीवाद केला होता.
  • व्होडाफोनने १४ हजार २०० कोटी रुपयांचा कर चुकवल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणातही हरीश साळवे यांनी युक्तीवाद केला होता. उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला. भारतीय कर प्रशासनाला परदेशात झालेल्या व्यवहारावर कर आकारण्याचा अधिकार नाही, असा युक्तीवाद हरीश साळवे यांनी मांडला होता. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने व्होडाफोनला या प्रकरणात क्लिन चीट दिली.

आणखी वाचा

हरीश साळवे यांचे छंद

हरीश साळवे यांना पियानो वाजवायला फार आवडतं असं ते एका मुलाखतीत म्हटले होते. क्युबाचा जॅझ पियानिस्ट गोंजालो रुबालकाबाचे ते चाहते आहेत.