घरदेश-विदेशयोगगुरू रामदेव बाबांच्या पंतजली कंपनीत २० हजारांहून अधिकांना मिळणार रोजगार!

योगगुरू रामदेव बाबांच्या पंतजली कंपनीत २० हजारांहून अधिकांना मिळणार रोजगार!

Subscribe

योगी आदित्यनाथ सरकारची योजना यशस्वी झाली तर दिल्लीला लागून असलेल्या यूपीच्या ग्रेटर नोएडामध्ये येत्या काही वर्षांत हजारो लोकांना रोजगार मिळण्याचा मार्ग सुकर होणार आहे. दरम्यान असे सांगितले जात आहे की, बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेद पार्क कंपनीचे काम लवकरच सुरू होणार आहे. पतंजली आयुर्वेदने यमुना प्राधिकरणाला ९८.४९ कोटींची थकबाकी भरली आहे. १८ महिन्यांत पतंजली आयुर्वेद पार्कचे बांधकाम पूर्ण होणार असून यामध्ये सौंदर्यप्रसाधने आणि आयुर्वेद उत्पादने तयार केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

अखिलेश यादव यांच्या नेतृत्वात पतंजली आयुर्वेद यांना समाजवादी राजवटीत सेक्टर २४ आणि २४ ए मध्ये ४३० एकर जागेचे वाटप करण्यात आले होते. आयुर्वेद पार्कसाठी १३० आणि फूड पार्कसाठी ३०० एकर जमीन देण्यात आली. पतंजली आयुर्वेदने यापूर्वी ७९ कोटी रुपये भरले आहेत. उर्वरित रक्कम ९८.४९ कोटीही प्राधिकरणास देण्यात आले आहेत. आयुर्वेद पार्कमध्ये प्रॉडक्शन युनिट, वेअरहाउस देखील बांधले जाणार आहे. असे सांगितले जात आहे की, कोरफड, साबण, टूथपेस्ट, केसांची उत्पादने, त्वचेची निगा राखणारे उत्पादनं इत्यादी आयुर्वेदिक औषधे आयुर्वेद पार्कमध्ये बनविली जणार आहेत. या आयुर्वेद आणि फूड पार्कमधून २० हजाराहून अधिक लोकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे. याचा फायदा परिसरातील शेतक़़ऱ्यांना देखील होणार आहे.

- Advertisement -

सीईओ डॉ अरुणवीर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, पतंजली आयुर्वेद यांनी पार्कचे बांधकाम लवकरच सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे. प्राधिकरणाची शिल्लक रक्कम दिली गेली आहे. यामुळे आगामी काळात ग्रेटर नोएडामध्ये रोजगाराच्या संधींमध्ये वाढ होणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. यासह येत्या दीड वर्षात पतंजली आयुर्वेद हर्बल उत्पादनांचे उत्पादन सुरू करण्यात येणार आहे. यासह या भागाचा विकास होणार असून २० हजारांहून अधिक लोकांना रोजगाराची संधी देखील मिळणार आहे.


‘केले तुका झाले माका’ म्हणत संजय राऊतांचा आमदारांच्या गैरवर्तनावर टोला
Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -