घरताज्या घडामोडीUkraine Russia Crisis: यूक्रेनवर कधीही टाकला जाऊ शकतो ४४ टनचा महाविनाशकारी 'फादर...

Ukraine Russia Crisis: यूक्रेनवर कधीही टाकला जाऊ शकतो ४४ टनचा महाविनाशकारी ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’

Subscribe

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यूक्रेनमध्ये ४४ टन वजनाचा सर्व बॉम्बचा बाप म्हणजेच ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ टाकण्यास तयार आहे. संरक्षण सुत्रांच्या माहितीनुसार, रशियाच्या राष्ट्रपतींनी यूक्रेनमधील मोहीमेत वापर करण्याचा आदेश दिला आहे. हा खुलासा तेव्हा झाला, जेव्हा नाटोने इशारा दिला की, मास्को कोणत्याही वेळी हल्ल्याची योजना बनवत आहेत.

‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ काय आहे?

असे म्हटले जात की, यापूर्वी ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ला सीरियामध्ये डीर एज-जोरमध्ये टाकले होते. या सुपर शक्तीशाली नॉन-न्यूक्लियर बॉम्ब ४४ टनहून अधिक असलेला या बॉम्बचा टीएनटीप्रमाणे विस्फोट होतो. विशानकारी हत्यार एक जेटमधून टाकले जाते. यामुळे सुपरसोनिक शॉकवेव्ह आणि अत्यंत उच्च तापमानामुळे सर्वाधिक नुकसान होते.

- Advertisement -

यूक्रेनच्या लोकांना मानसिक रित्या तोडणार हा बॉम्ब

सीरियामध्ये याचा वापर केला होता. युद्ध सुरू झाल्यासाठी आणि यूक्रेनच्या लोकांच्या भावना तोडण्यासाठी हा बॉम्ब टाकला जाऊ शकतो. या बॉम्बमुळे मोठी जीवितहानी आणि टाक्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. दरम्यान रशियाने परमाणू बॉम्ब टाकण्याची तोफ तैनात केली आहे. परमाणूचा हल्ला करण्यासाठी 2S7 Pion तोफ यूक्रेनच्या दुसरे मोठे शहर खारकीवजवळ असलेल्या सीमेवर तैनात केले आहे. ही तोफ ३७ किलोमीटरपर्यंत परमाणू बॉम्ब टाकू शकते. यामुळे तुम्ही कल्पना करू शकता की, किती मोठी नुकसान होईल.

यापूर्वी आज रशियाच्या राष्ट्रपतीने हायपरसोनिक बॅलिस्टिक मिसाइल आणि इतर हत्याराचे प्रक्षेपणसंबंधित सामरिक परमाणूचा अभ्यास पाहिले. क्रेमलिननुसार, दोन बॅलिस्टिक मिसाइल लाँच केले आहे. एक उत्तर-पश्चिम रशियाच्या एकाबाजूने आणि दुसरे बार्ट्स सीमेमध्ये एक पानबुड्डीहून केली आहे. हजारो मैल्य दूर लक्ष्य करण्याचा हेतू आहे.

- Advertisement -

१९४५ सालानंतर सर्वात मोठे युरोपमध्ये युद्ध

बोरिस जॉन्सन यांनी आज इशारा दिला की, ‘यूक्रेनवर रशिया लवकरच हल्ला करू शकतो. जर यूक्रेनवर हल्ला केला तर, याचा मोठा परिणाम जगावर होऊ शकतो. १९४५नंतर युरोपमध्ये हे सर्वात मोठे युद्ध होणार आहे.’


हेही वाचा – Russia Ukraine Crisis: यूक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणा; जयंत पाटलांची पंतप्रधानांना विनंती


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -