घरदेश-विदेशकर्म किसीका पिछा नहीं छोडता - शिवराज सिंह

कर्म किसीका पिछा नहीं छोडता – शिवराज सिंह

Subscribe

१९८४ साली शिख विरोधी दंगल प्रकरणात कमलनाथ यांचाही हात असल्याचे म्हणत भाजप नेते कमलनाथ यांना मुख्यमंत्रीपदासाठी योग्य नसल्याचे म्हणत होते. याप्रकरणी शिवराज सिंह यांनी ट्विट केले आहे. दरम्यान, आज कमलनाथ यांनी मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

१९८४ मध्ये उसळलेल्या शीख विरोधी दंगल प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने काँग्रेसचे नेते सज्जन कुमार यांना दोषी ठरवले आहे. दंगल घडवणे आणि कारस्थान रचणे हे गुन्हे सिद्ध झाल्यानंतर न्यायालयाने सज्जन कुमार यांना जन्मठेपाची शिक्षा सुनावली आहे. याच प्रकरणात काँग्रेसचे नेते कमलनाथ यांचे नाव पुढे येताना दिसत होते. याच मुद्याच्या पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांनी कमलनाथ यांच्यावर निशाना साधला. त्याचबरोबर या प्रकरणात कमलनाथ यांचाही हात असल्याचे म्हणत ते मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाला योग्य नाहीत, अशी टीका भाजप नेत्यांकडून करण्यात येत होती. अशीच टीका मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते शिवराज सिंह चौहान यांनी केली आहे. याप्रकरणी त्यांनी ‘कर्म किसीका पिछा नहीं छोडता’ अशी टीका ट्विटरमार्फत केली आहे.


हेही वाचा – मध्य प्रदेश निवडणूक २०१८: शिवराजसिंह चौहान या चुका नडल्या

- Advertisement -

कमलनाथ यांचा शपथविधी सोहळ्यात सहभाग

शिवराज सिंह यांनी ट्विट केल्यानंतर ते मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यात सहभागी झाले. यावेळी भाजप नेते कमलनाथ यांनी शपथ घेतली. याचबरोबर ज्योतिरादित्य सिंधिया यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या सोहळ्यात शिवराज सिंह चौहान सोबतच भाजपचे अनेक नेतेमंडळी हजर राहिले. या सोहळ्यानंतर शिवराज सिंह यांनी दोन्ही नेत्यांना अभिनंदन केले.


हेही वाचा – मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांचे काँग्रेसला चोख प्रत्युत्तर

- Advertisement -


हेही वाचा – स्वातंत्र्य लढ्यासाठी योगदान देणाऱ्याचे नाव सांगा; कमलनाथांचे मोदींना आव्हान

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -