घरदेश-विदेश'बंगालला त्रास देण्यासाठी भाजपचा नवा कट' - ममता बॅनर्जी

‘बंगालला त्रास देण्यासाठी भाजपचा नवा कट’ – ममता बॅनर्जी

Subscribe

पश्चिम बंगालमध्ये जाणून बुजून लोकसभा निवडणुका लांबवल्या जात असल्याचा आरोप मुख्यमंत्री आणि तृणमुल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी केला आहे.

लोकसभा निवडणुकांसाठी मतदानाच्या तारखांची घोषणा करण्यात आली. मात्र, आता या तारखांवरुन एक नवीन वाद उदयास आला आहे. ‘बंगालला त्रास देण्यासाठी आणखी एका हल्ल्याचा नवा कट भाजपाने आखला’ असल्याचा आरोप मुख्यमंत्री आणि तृणमुल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी केला आहे. तसेच ‘पश्चिम बंगालमध्ये जाणून बुजून लोकसभा निवडणुका लांबवल्या जात’ असल्याचे देखील त्या म्हणाल्या आहेत.

ममता दीदी काय म्हणाल्या

पश्चिम बंगालमध्ये निवडणुका लांबवल्याने प्रचंड उन्हाळा असणार आहे. या उकाड्यामुळे उमेदवार आणि मतदारांना याचा प्रचंड त्रास होणार आहे. तसेच रमजानच्या पवित्र महिन्यात मतदान आल्याने रोजा ठेवणाऱ्या मुस्लिम मतदारांनाही यामुळे त्रास होणार आहे.’ दरम्यान, पत्रकार परिषदेत बोलताना बॅनर्जी म्हणाल्या, ‘कृपया माझे म्हणणे चुकीच्या पद्धतीने मांडू नका कारण, निवडणूक आयोगासारख्या संविधानिक संस्थेचा मी सन्मान करते. मात्र, पश्चिम बंगालमध्ये वातावरण बिघडण्याचा भाजपाचा डाव आहे’, असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला आहे.

- Advertisement -

भाजपा लोकांना अनादर करते

‘मी माझ्या राज्यातील लोकांना जाणते, त्यांच्याप्रती माझ्या मनात खूपच आदर आहे. मात्र, भाजपा त्यांचा अनादर करते. तसेच त्यांनी माझ्या आणि बंगालच्याविरोधात कट रचला आहे. मात्र, हा कट त्याच्यावरच उलटणार आहे’, असे देखील त्या म्हणाल्या आहेत.


वाचा – ‘रमजान’साठी मतदानाच्या तारखा बदला; मुस्लिमांची मागणी

- Advertisement -

वाचा – पार्थसाठी माढा सोडले…; रोहित पवार म्हणतो ‘साहेब तुम्ही लढाच’!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -