रिझर्व्ह बँकेच्या धोरणानंतर शेअर बाजार गडगडला, सेन्सेक्स २१४ अंकांनी घसरला

share market

रिझर्व्ह बँकने (RBI) आपल्या धोरणांत बदल केल्यानंतर त्याचा परिणाम शेअर बाजारावर (Share Market) झाल्याचं दिसून आलं आहे. रेपो रेट (Repo Rate) आणि व्याज दरात वाढ केल्यानंतर शेअर बाजार गडगडला आहे. शेअर बाजारात आज सेन्सेक्स (Sensex) २१४ अंकांनी घसरला आहे. तर निफ्टीही (Nifty) ६० अंकांनी घसरली आहे. सेनसेक्समध्ये ०.३९ टक्क्यांची घसरण झाली असून सेन्सेक्स ५४,८९२ अंकांवर बंद झाला आहे. तर निफ्टीमध्येही ०.३७ टक्क्यांची घसरण झाली आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेकडून आज नवीन रेपो दर जाहीर करण्यात आला आहे. रिझर्व्ह बँकेने रेपो दरात ५० बेसिस पॉईंटने वाढ केली आहे. सध्या महागाईवर नियंत्रण मिळवण्यावर रिझर्व्ह बँकेचे प्रमुख लक्ष्य असल्याचे रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी सांगितले आहे.

शेअर बाजार बंद होताना आज १५४१ कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे. तर १७३४ कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे. तसेच १२४ कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाहीये. आरबीआयच्या नव्या धोरणानुसार आता रेपो दर ४.९० टक्के इतका झाला आहे. त्यामुळे कर्ज महागणार असून ईएमआयदेखील वाढणार आहे.

या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घट

काही कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. यामध्ये Bharti Airtel या कंपनीमध्ये ३.२१ टक्क्यांची घट झाली आहे. तर ITC या कंपनीमध्ये २.१९ टक्के, Relianceमध्ये १.७६ टक्के, UPLमध्ये १.४८ टक्के, तर Asian Paintsमध्ये १.४४ टक्क्यांची घट झाली आहे.

गेल्या महिन्यात बँकेने अचानक व्याजदर वाढवला होता. त्या पार्श्वभूमीवर गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी कर्जदारांसाठी रेपो वाढीची घोषणा केली होती. या दरवाढीनंतर रेपो दर ४.९० टक्के झाला आहे.दरम्यान, महागाईचे दर आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे महागाईचे जागतिकीकरण झाले असल्याचेही शक्तिकांत दास यांनी सांगितले आहे.


हेही वाचा : सेन्सेक्स आणि निफ्टी : शेअर बाजाराचा तापमापक