गुजरातमध्ये केमिकल ट्रक आणि कारला भीषण अपघात, ६ जणांचा आगीत होरपळून मृत्यू

गुजरातच्या मोडसा जिल्ह्यातील आलमपूर गावाजवळ शनिवारी सकाळच्या सुमारास दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली असून ट्रकच्या धडकेत एक कारहीआली. त्यामुळे या तिन्ही वाहनांनी पेट घेतला.

केमिकलने भरलेले दोन ट्रक आणि कारच्या अपघातात (Two trucks and cars accident) भीषण आग लागल्याने सहा जण जिवंत जळाल्याची धक्कादायक घटना गुजरातमध्ये घडली आहे. गुजरातच्या मोडासा जिल्ह्यातील (modasa district of gujarat) आलमपूर गावाजवळ (Alampur village ) हा अपघात झाला. या अपघातात एका ट्रकचा क्लिनर, दुसऱ्या ट्रकचा चालक आणि क्लिनर आणि कारमधील तीन जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या (fire brigade) जवानांनी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्यास सुरूवात केली. तसेच, स्थानिक पोलीसही (Police) बचावकार्य करत असून, या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातच्या मोडसा जिल्ह्यातील आलमपूर गावाजवळ शनिवारी सकाळच्या सुमारास दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली असून ट्रकच्या धडकेत एक कारही (car accident) आली. त्यामुळे या तिन्ही वाहनांनी पेट घेतला. आग इतकी भीषण होती की, त्या कारमधील प्रवाशांना बाहेर येणार मार्ग मिळत नव्हता. त्यामुळे त्या आगीत सहा जणांचा होरपळून मृत्यू झाला.

हेही वाचा – चंद्रपुरात पेट्रोल टँकर-ट्रकच्या अपघातात नऊ जणांचा मृत्यू

दोन ट्रक आणि कारच्या भीषण अपघातामुळे मोडासा-नडियाड महामार्ग (Modasa-Nadiad highway) बंद करण्यात आला आहे. महामार्गावर दोन्ही बाजूंनी सुमारे 10 किमी लांब वाहतूक कोंडी झाली आहे. घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्तीचे प्रयत्न करत आहेत.

हेही वाचा – यमुना एक्स्प्रेसवर बोलेरो आणि डंपरचा भीषण अपघात; 7 जणांचा मृत्यू

आग लागल्यानंतर एका चालकाने ट्रकमधून उडी मारली होती. त्यामुळे त्याचा जीव वाचला. मात्र, उडी मारताना तो जखमी झाला. तर त्याच्या ट्रकचा क्लिनर ट्रकमधून बाहेर पडू शकला नाही आणि त्याचा मृत्यू झाला. त्याचवेळी, दुसऱ्या ट्रकमध्ये दोन मृतदेह आहेत, जे चालक आणि क्लिनरचे असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.


हेही वाचा – Indian Railway Strike : आता रेल्वे स्टेशन मास्टरांचे आंदोलन; रेल्वे प्रवासावर होणार परिणाम