अमेरिकेत Layoff : H-1B व्हिसावर असलेल्या भारतीयांसमोर मोठं आव्हान, जो बायडनकडूनही चिंता व्यक्त

America Layoff | तेथे नोकरीनिमित्त गेलेल्या भारतीयांसमोर अमेरिकेत राहायचं असेल तर नवी नोकरी शोधण्याचं मोठं आव्हान आहे. यावरून अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन यांनी चिंता व्यक्त केली आहे.

Ukraine Russia War Syed Akbaruddin reaction on US threatens India from Russia

America Layoff | वॉशिंग्टन – जगभरात आर्थिक मंदीचे वारे घोंघावत असल्याने अनेकांच्या नोकऱ्यांवर कुऱ्हाड पडली आहे. अनेक जागतिक कंपन्यांनी कर्मचारी कपातीला सुरुवात केली असून यामध्ये अमेरिकेच्या सर्वाधिक कंपन्यांचा समावेश आहे. त्यामुळे याचा थेट परिणाम कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर होत आहे. तसंच, H-1B व्हिसावर असलेल्या भारतीय कर्मचाऱ्यांच्याही नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. त्यामुळे तेथे नोकरीनिमित्त गेलेल्या भारतीयांसमोर अमेरिकेत राहायचं असेल तर नवी नोकरी शोधण्याचं मोठं आव्हान आहे. यावरून अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन यांनी चिंता व्यक्त केली आहे.

व्हाइट हाऊसचे माध्यम सचिव जीन पियरे यांनी मंगळवारी सांगितलं की, “नोकरी गेल्यामुळे त्याचा प्रत्यक्ष परिणाम संबंधित कर्मचाऱ्याच्या कुटुंबावर होत असतो, अशी चिंता राष्ट्रपती जो बाडयन यांनी व्यक्त केली आहे. अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्याकरता बायडन सरकार प्रयत्नशील आहे. तसंच, अमेरिकेची अर्थव्यवस्था सर्वांसाठी काम करते.”

हेही वाचा – धक्कादायक! अमेरिकेतील सीएनएनपासून ते वॉशिंग्टन पोस्टपर्यंतच्या सर्व मीडियात कर्मचारी कपात

अमेरिकेत झालेल्या मोठ्या कर्मचारी कपातीमध्ये सर्वाधिक भारतीयांचा समावेश आहे. त्यातही आयटी क्षेत्रातील भारतीय कर्मचाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात नोकऱ्या गेल्या आहेत. हे भारतीय कर्मचारी तेथे H-1B व्हिसावर तेथे स्थायिक आहेत. व्हिजा नियमांनुसार विहित काळात नोकरी शोधणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे भारतीय कर्मचाऱ्यांसमोर हे सर्वांत मोठं आव्हान आहे.

हेही वाचा – घरोघरी बेरोजगारी, तरुणांच्या भविष्यात लख्खं अंधार!

गेल्या काही दिवसांत सातत्याने मोठ्या कंपन्यांनी कर्मचारी कपात केली आहे. मायक्रोसॉफ्ट, फेसबूक, अॅमेझॉनसारख्या कंपन्यांनी हजारो कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे. तर, गुगलनेही १२ हजार कर्मचाऱ्यांना बाहरेचा रस्ता दाखवला आहे. याआधी अॅमेझॉनने १८ हजार, तर मेटाने १० हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकलं होतं. कर्मचारी कपातीचे हे लोण भारतातही पसरलं असून इ-कॉमर्सपासून, फूड डिलिव्हरी करणाऱ्या कंपन्यांपर्यंत सर्वांनी नोकरकपातीची घोषणा केली आहे. त्यामुळे विदेशात असलेल्या भारतीयांच्या नोकऱ्या धोक्यात असताना भारतातही येथील कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात आहेत.

हेही वाचा – स्विगीने ३८० कर्मचाऱ्यांना दिला नारळ