घरदेश-विदेशभाजपाला 'या' नेत्यामध्ये दिसतोय नरेंद्र मोदींचा 'उत्तराधिकारी'?

भाजपाला ‘या’ नेत्यामध्ये दिसतोय नरेंद्र मोदींचा ‘उत्तराधिकारी’?

Subscribe

शुक्रवारी संध्याकाळी ४ वाजता लखनऊ येथील अटलबिहारी वाजपेयी स्टेडियमवर शपथविधी सोहळा संपन्न होणार आहे. या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमध्ये ४८ मंत्री शपथ घेतील, अशी माहिती मिळते.

आज योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. योगी आदित्यनाथ सलग दुसऱ्यांदा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. लखनौमधील अटलबिहारी वाजपेयी क्रिकेट स्टेडियम (एकना स्टेडियम) इथं या भव्य शपथविधी सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात भारतीय जनता पक्षानं ज्या प्रकारे पूर्ण ताकद लावली आहे, त्यातून सर्वात मोठा संदेश देण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा संदेश म्हणजे भाजपला नरेंद्र मोदींनंतरचा दुसरा मोठा नेता देशाला मिळाला आहे. योगी आदित्यनाथ यांच्यात भाजपला नरेंद्र मोदींचा ‘उत्तराधिकारी’ सापडला आहे का, असा सवालही उपस्थित होत आहे.

शुक्रवारी संध्याकाळी ४ वाजता लखनऊ येथील अटलबिहारी वाजपेयी स्टेडियमवर शपथविधी सोहळा संपन्न होणार आहे. या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमध्ये ४८ मंत्री शपथ घेतील, अशी माहिती मिळते.

- Advertisement -

शपथ घेण्यापूर्ण अनेक आमदार योगी आदित्यनाथ यांची भेट घेण्यासाठी पोहचल्याचं समजतं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह संत, महंत, उद्योजकांची उपस्थिती असणार आहे. याशिवाय या सोहळ्याला भाजप सरकार असलेल्या राज्यातील मुख्यमंत्री देखील उपस्थित असणार आहेत. संपूर्ण एनडीए आणि भाजपचे शीर्ष नेतृत्व लखनऊमध्ये येत आहे. एवढेच नाही तर मुख्यमंत्र्यांसह राजकारणी, विरोधी पक्षांचे दिग्गज नेते, राष्ट्रीय स्वयं संघ आणि देशभरातून संत मंडळी जमत आहेत.

योगींच्या शपथविधीला बॉलीवूड स्टार्ससह देशातील सर्व नामांकित उद्योगपतीही उपस्थित राहणार आहेत. एवढेच नाही तर संपूर्ण राज्यात शपथविधीचे थेट प्रक्षेपण करण्यासाठी एलईडीची व्यवस्था करण्यात आली आहे. शपथविधीसोबतच राज्यातील मंदिरांमध्ये घंटानाद सुरू होईल. संपूर्ण लखनौमध्ये होर्डिंग्ज आणि पोस्टर्स लावण्यात आले आहेत.

- Advertisement -

या शपथविधीमध्ये लखनौमध्ये संपूर्ण एनडीए दिसत आहे. शिवाय योगी आदित्यनाथ यांच्या भाजपमधील वाढत्या वर्चस्वाची सर्वाधिक चर्चा होत आहे. 2017 मध्ये जेव्हा योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री बनवण्यात आले तेव्हा त्यांची प्रतिमा हिंदुत्वाच्या फायर ब्रँड नेत्याची होती आणि ते भाजपचे खासदार होते.

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -