घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

मग सरिसेपणें उठावले | दुणवटोनी उचलले | तया दंडी क्षोभलें | लोकत्रय //
मग ते मोठ्या तयारीने पुढे सरसावले व त्यानी दुप्पट आवेशाने चाल केली. तेव्हा त्या आवेशयुक्त सैन्याच्या योगाने त्रिभुवन अगदी त्रस्त होऊन गेले.
तेथ बाणवरी धनुर्धर | वर्षताती निरंतर | जैसा प्रळयांत जलधर | अनिवार कां //
ज्याप्रमाणे प्रलयकालचे दुर्धर मेघ एकसारखी वृष्टि करीतात, त्याप्रमाणे तेथे धनुर्धर तीक्ष्ण बाणांची वृष्टि करू लागले.
तें देखलिया अर्जुनें | संतोष घेऊनि मनें | मग संभ्रमें दिठी सेने | घालीतसे //
ते पाहून अर्जुनाच्या मनाला फार संतोष झाला व त्याने मोठ्या आवेशाने सैन्यावर द्दष्टी फेकली.
तंव संग्रामीं सज्ज जाहले | सकळ कौरव देखिले | तंव लीलाधनुष्य उचलिलें | पंडुकुमरें //
तेव्हा सर्व कौरव युध्दास सिद्ध झालेले पाहून पंडुपुत्राने सहज लीलेने धनुष्य उचलिले.
ते वेळीं अर्जुन म्हणतसे देवा | असतां झडकरी रथु पेलावा | नेऊनि मध्यें घालावा | दोहीं दळां //
मग अर्जुन म्हणाला, “देवा, आतां आपला रथ लवकर चालवा आणि दोन्ही सैन्याच्या मध्ये नेऊन उभा करा.
जंव मी नावेक | हे सकळ वीर सैनिक | न्याहाळीन अशेख | झुंजते जे //
म्हणजे तेथे युद्ध करण्याकरिता आलेल्या वीरांस मी क्षणभर न्याहाळून पाहीन.
येथ आले असती आघवे | परी कवणेंसीं म्यां झुंजावें | हें रणीं लागे पहावें | म्हणौनियां //
कारण, येथे जरी सर्व वीर जमले आहेत, तरी रणांगणावर मला कोणाशी युद्ध करावयाचे आहे, ते पाहिले पाहिजे.
बहुतकरूनि कौरव | हे आतुर दु:स्वभाव | वांटिवेवीण हांव | बांधिती झुंजी //
हे बहुतेक उतावळे व दुष्टबुध्दि कौरव अंगात पराक्रम नसता युध्दाची हाव धरीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -