Wednesday, May 31, 2023
27 C
Mumbai
घर संपादकीय वाणी संतांची वाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

नातरी महासिद्धिसंभ्रमें। जिंतला तापसु भ्रमें। मग आकळूनि कामें । दीनु कीजे //
आपल्याला अणिमादि महासिद्धी मिळाव्या या मोहाने परवश झालेला तपस्वी भ्रम पावतो व त्या सिद्धीविषयीची इच्छा त्याच्या अंत:करणाला व्यापून दीन करून सोडते.
तैसा तो धनुर्धरु | अत्यंत दु:खें जर्जरु। दिसे जेथ रहंवरु | त्यजिला तेणें //
त्याप्रमाणे तो धनुर्धर अर्जुन रथस्थानावरून खाली उतरला, त्या वेळी तो दुःखाने अतिशय व्याकुळ झालेला दिसू लागला.
मग धनुष्यबाण सांडिले | न धरत अश्रुपात आले । ऐसें ऐक राया वर्तलें। संजयो म्हणे //
संजय म्हणतो, राजा, आणखी असे झाले की, त्याने धनुष्यबाण टाकून दिले व त्याच्या डोळ्यातून सारख्या अश्रुधारा वाहू लागल्या.
आतां यावरी तो वैकुंठनाथु । देखोनि सखेद पार्थु । कवणेपरी परमोर्थु। निरूपील //
आता यापुढे अर्जुनास दुःख झालेले पाहून वैकुंठनाथ श्रीकृष्ण त्यास कशा रीतीने तत्त्वज्ञानाचा उपदेश करतील,
ते सविस्तर पुढारी कथा | अति सकौतुक ऐकतां | ज्ञानदेव म्हणे आतां | निवृत्तिदासु //
ती पुढे येणारी सविस्तर कथा उत्सुकतेने ऐका, असे निवृत्तीनाथाचे दास श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणाले.
मग संजयो म्हणे रायातें। आईके तो पार्थु तेथें। शोकाकुल रुदनातें | करितु असे //
मग संजय धृतराष्ट्र राजास म्हणाला:- महाराज, ऐका. अर्जुन त्या ठिकाणी शोकाने व्याकुळ होऊन रुदन करू लागला.
तें कुळ देखोनि समस्त। स्नेह उपनलें अद्भुत | तेणें द्रवलें असे चित्त | कवणेपरी //
ते आपले सर्व कूळ पाहून त्याच्या मनात विलक्षण मोह उत्पन्न झाला आणि त्या योगाने त्याचे मन द्रवले; कसे म्हणाल तर,
जैसें लवण जळें झळंबले | ना तरी अभ्र वातें हाले। तैसें सधीर परी विरमलें। हृदय तयाचें //
पाण्याने ज्याप्रमाणे मीठ विरघळते, अथवा वार्‍याने ज्याप्रमाणे ढग नाहीसे होतात, त्याप्रमाणे; तो मोठा धैर्यवान होता तरी त्याच्या हृदयास द्रव आला!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -