घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

सांडीं हें मूर्खपण । उठीं घे धनुष्यबाण । संग्रामी हें कवण । कारुण्य तुझें?॥
हा वेडेपणा टाकून दे. ऊठ व धनुष्यबाण हाती घे. कारण, या रणांगणावर तुझ्या या करुणेचा काय उपयोग?
हां गा तूं जाणता । तरी न विचारिसी कां आतां । सांगैं जुंझावेळे सदयता । उचित कायी?॥
अर्जुना, अरे तू ज्ञाता ना? या वेळी विचार कसा करीत नाहीस? अरे, युद्धाचे प्रसंगी दया असणे योग्य आहे का, सांग बरे?
हे असतिये कीर्तीसी नाशु । आणि पारत्रिकासी अपभ्रंशु । म्हणे जगन्निवासु । अर्जुनातें ॥
हे तुझे वर्तन आजपर्यंत संपादन केलेल्या कीर्तीचा नाश करणारे व परलोकप्राप्तीस अडथळा आणणारे आहे! असे श्रीकृष्ण अर्जुनास म्हणाले.
म्हणोनि शोकु न करीं । तूं पुरता धीरु धरीं । हे शोच्यता अव्हेरीं । पंडुकुमरा ॥
म्हणून, अर्जुना तू दुःख करू नको, पूर्ण धीर धर आणि आप्तांविषयीचा हा विषाद सोडून दे.
तुज नव्हे हें उचित । येणें नासेल जोडलें बहुत । तूं अझुनि वरी हित । विचारीं पां ॥
तुला असा खेद करणे शोभत नाही. तू आजपर्यंत जे काही यश मिळवले आहेस, त्याचा या योगाने नाश होईल; म्हणून तू अजून तरी आपले हित कशात आहे याचा विचार कर.
येणें संग्रामाचेनि अवसरें । एथ कृपाळूपण नुपकरे । हे आतांचि काय सोयरे । जाहले तुज? ॥
लढईच्या ऐन प्रसंगी कृपाळूपणा कामाचा नाही. हे कौरव काय आताच तुझे नातलग झाले आहेत?
तूं आधींचि काय नेणसी । कीं हे गोत्रज नोळखसी?। वायांचि काय करिसी । अतिशो आतां? ॥
अरे ही गोष्ट तुला पूर्वी माहीत नव्हती का? किंवा हे नातेवाईक आहेत हे तू जाणत नव्हतास काय? मग आताच व्यर्थ खेद का करतोस!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -