‘ही’ अभिनेत्री आहे ह्रता दुर्गुळेची होणारी सासू

स्टार प्रवाहवरील प्रसिद्ध मालिका देवयानीमध्ये देखील मुग्धा यांनी आई साहेबांची भूमिका साकारली होती.

Actress Mugdha Shah is the mother-in-law of actress Hruta Durgule
'ही' अभिनेत्री आहे ह्रता दुर्गुळेची होणारी सासू

दुर्वा, फुलपाखरू आणि मन उडू उडू झालंया अशा जबरदस्त मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री ह्रता दुर्गुळेने नुकताच तिच्या चाहत्यांना खुशखबर दिली आहे. ह्रताने तिच्या खऱ्या आयुष्यातील जोडीजदाराविषयी खुलासा केला. ह्रता टीव्ही डिरेक्टर प्रतीक शाह सोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे तिच्या पोस्टमधून सांगितले आहे. ह्रताच्या या बातमीनंतर अनेक कलाकारांनी तिला शुभेच्छा दिल्यात. ह्रता सध्या प्रतीक सोबत डेट करत आहे. प्रतीक हा हिंदी टेलिव्हिजवरील प्रसिद्ध डिरेक्टर आहे. हिंदी टेलिव्हिजवरील ‘तेरी मेरी इक जिंदडी’, ‘बहु बेगम’, ‘कुछ रंग के प्यार ऐसे भी’, ‘एक दिवाना था’, ‘मनमोहिनी’ अशा अनेक मलिकांचे डिरेक्शन प्रतीकने केले आहे. प्रतीकची आई देखील सिनेसृष्टीशी निगडीत आहे. मराठमोळी अभिनेत्री मुग्धा शाह यांचा प्रतीक मुलगा आहे. प्रतीक आणि मुग्धा यांच्या सोशल मीडियावर त्यांचे अनेक एकत्र फोटो पहायला मिळत आहेत. त्यामुळे ह्रताचं होणार सासर देखील सिनेसृष्टीशी निगडीत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prateek Shah (@prateekshah1)


ह्रताची होणारी सासू म्हणजेच अभिनेत्री मुग्धा शाह यांनी अनेक मराठी मालिका तसेच अनेक सिनेमांमध्ये प्रमुख व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. मुग्धा यांना प्रेक्षकांनी अनेक हिंदी मराठी मालिकांमध्ये पाहिले आहे. मुग्धा शाह या प्रेक्षकांचा एक ओळखीचा चेहरा आहे. मुग्धा यांनी ५० वर्षांहून अधिक काळ अभिनय क्षेत्रात काम केले आहे. त्या मुळच्या गोव्याच्या असून सध्या आपल्या कुटुंबासोबत मुंबईत वास्तव्यास आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prateek Shah (@prateekshah1)

दूरदर्शनवरील मालिकांमधून त्यांनी अभिनयाला सुरुवात केली. ‘हसरते’ ही त्यांची मालिका. या मलिकेनंतर त्यांना अनेक मलिका आणि सिनेमाच्या ऑफर्स आल्या. स्टार प्रवाहवरील प्रसिद्ध मालिका देवयानीमध्ये देखील मुग्धा यांनी आई साहेबांची भूमिका साकारली होती. स्टार प्लसवरील ‘लाखो में एक’ मालिकेत ही त्यांनी प्रमुख भूमिका साकारली होती.

मराठी सिनेसृष्टीतही मुग्धा यांनी अनेक सिनेमात काम केले आहे. ‘कुंक लावते माहेरचं’, ‘होऊन जाऊ दे’, ‘बे दुणे साडे चार’ या मराठी सिनेमातही काम केले आहे. केवळ मराठी आणि हिंदी नाही तर गुजराती भाषेतही त्यांनी अनेक कामे केली आहेत. ‘संबंध नी पेले परी’, ‘लक्ष्मीकांत भाई’ अशा अनेक गुजराती नाटक आणि सिनेमात कामे केली आहेत. मुग्धा या अभिनयासोबतच फिटनेस फ्रीक देखील आहेत. त्याचप्रमाणे अनेक महिलांना देखील त्या मदत करतात. अनेक महिलांना योगा शिकवण्याचे काम त्या करतात. अनेक वर्ष अभिनय क्षेत्रात काम करुन जे समाधान मिळाले नाही ते समाधान मला या सामाजिक कार्यात मिळते असे त्या म्हणतात.


हेही वाचा – Hruta Durgule Boyfriend: इंद्रा नाही तर ‘या’ व्यक्तीवर जडलं ह्रताचं मन, दिली प्रेमाची कबुली