‘नाय वरन भात लोन्चा’ चित्रपटामुळे दिग्दर्शक महेश मांजरेकर अडचणीत, माहिम पोलिसांत गुन्हा दाखल

Case filed against Mahesh Manjrekar for portraying children in objectionable manner
नाय वरन भात लोन्चा चित्रपटामुळे दिग्दर्शक महेश मांजरेकर अडचणीत, माहिम पोलिसांत गुन्हा दाखल

प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडलेला ‘नाय वरन भात लोन्चा’ या मराठी चित्रपटामुळे दिग्दर्शक महेश मांजरेकर आता पुन्हा अडचणीत आले आहेत. कारण या चित्रपटामुळे त्यांच्याविरोधात मुंबईतील माहिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे महेश मांजरेकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अलीकडेच महेश मांजरेकर यांनी दिग्दर्शत केलेला ‘नाय वरन भात लोन्चा’ हा चित्रपट रिलीज झाला. परंतु हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच विविध कारणांमुळे वादात सापडला होता. अनेकांनी या चित्रपटातून गिरणी कामगारांचा अपमान केल्याचे म्हटले तर अनेकांनी चित्रपटाच्या नावाविरोधात आक्षेप नोंदवला होता.

मात्र आता चित्रपटातील अल्पवयीन मुलांच्या आक्षेपार्ह दृश्यांविरोधात माहिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर येत आहे. एनआयए वृत्तसंस्थेच्या ट्विटमध्ये म्हटलय की, माहिम पोलिसांच्या माहितीनुसार, मराठी चित्रपटात अल्पवयीन मुलांचे आक्षेपार्ह दृश्य दाखवल्याने प्रसिद्ध मराठी चित्रपट दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्याविरोधात कलम 292, कमल 34 तसेच पोस्को कलम 14 आणि IT कलम 67 व 67 बनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच याप्रकरणी न्यायालयाने चौकशीचे आदेश दिले आहेत.

 


महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘नाय वरन भात लोन्चा’ या चित्रपटातील अनेक दृश्यांना विरोध करण्यात आला होता. या चित्रपटातील अल्पवयीन मुलांवर चित्रीत करण्यात आलेल्या काही दृश्यांवर आक्षेप घेण्यात आला होता. त्यावरूनच महेश मांजरेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर येत आहे. मात्र या प्रकरणी अद्याप महेश मांजरेकर यांच्याकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.


समीर वानखेडे यांची ठाण्यात आठ तास चौकशी; कोपरी पोलीस ठाण्यात झाले वकिलांसह हजर