घरताज्या घडामोडीGangubai Kathiawadi Box Office Collection : गंगूबाई काठियावाडीचा बॉक्स ऑफिसवर धुरळा

Gangubai Kathiawadi Box Office Collection : गंगूबाई काठियावाडीचा बॉक्स ऑफिसवर धुरळा

Subscribe

गुजरात मधल्या एका लहान खेडेगावातून आलेल्या गंगापासून ते मुंबई मधल्या माफिया क्वीन गंगूबाई पर्यंतचा प्रवास या चित्रपटातून दाखवलेला आहे. 

Gangubai Kathiawadi Box Office Collection : संजय लीला भंसाळीद्नारा दिग्दर्शित गंगुबाई काठियावाडी हा चित्रपट २५ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला असून या चित्रपटाने अवघ्या काही दिवसात करोडोंचा टप्पा पार केला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाचं आलियाने संजय लीला भंसाळींबरोबर काम केलं आहे. या चित्रपटाला पहिल्या दिवसापासूनचं प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं आहे. पहिल्या आठवड्यातचं या चित्रपटाने 38 करोडची कमाई केली होती. आता या चित्रपटाने जवळ-जवळ 63.53 करोडचा टप्पा गाठला आहे.

- Advertisement -

या चित्रपटाला आलियाने तिच्या अभिनयाने चार चाँद लावलेले आहेत. गंगूबाई या व्यक्तीरेखेच्या वेगवेगळ्या छटा आलियाने योग्य प्रकारे साकारल्या आहेत.

- Advertisement -

गुजरात मधल्या एका लहान खेडेगावातून आलेल्या गंगापासून ते मुंबई मधल्या माफिया क्वीन गंगूबाई पर्यंतचा प्रवास या चित्रपटातून दाखवलेला आहे.

खरंतर हा चित्रपट हुसैन जैदी यांच्या ‘माफिया क्वीन ऑफ मुंबई’ या पुस्तकावर आधारित आहे. पुस्तकानुसार गंगूबाई गुजरातील काठियावाड येथे राहणारी होती. यामुळेच तिला गंगूबाई काठियावाडी या नावाने ओळखलं जाऊ लागलं.

गंगूबाईचं मूळ नाव गंगा हरजीवनदास काठियावाडी असं होतं. तिला अभिनेत्री व्हायचं होतं, तिचे वडील एक वकील होते. त्यांच्या अकाउंटन्टच्या प्रेमात ती पडली आणि वयाच्या १६ व्या वर्षी ती त्याच्याशी लग्न करून मुंबईमध्ये पळुन आली.

मोठमोठी स्वप्न पाहणाऱ्या गंगूला तिच्या नवऱ्याने अवघ्या ५०० रुपयांसाठी विकलं होतं. तिथून पुढे गंगूबाईच्या संघर्षाला सुरुवात झाली. पुढे गंगूबाई गुंड करीम लालला सुद्धा भेटली. गंगूबाईने करीम लालला राखी बांधून भाऊ मानलं होतं.या चित्रपटात करीम लालाची भूमिका अभिनेता अजय देवगणने साकारली आहे.


हेही वाचा – गंगूबाई काठियावाडी यांची खरी कहाणी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -