घरमनोरंजनजॉनी डेप उत्तम अभिनेता; अँबर हर्डकडून ट्रोलर्सना सडेतोड उत्तर

जॉनी डेप उत्तम अभिनेता; अँबर हर्डकडून ट्रोलर्सना सडेतोड उत्तर

Subscribe

एका मुलाखतीत ती म्हणाली की, सोशल मीडिया युजर्स कोणताही निर्णय कसं काय घेऊ शकतात. जॉनी एक उत्तम अभिनेता आहे, असं म्हणत तिने ट्रोलर्सवर टीका केली आहे.

हॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता जॉनी डेप (Johnny Depp)सध्या प्रचंड चर्चेत आहे. त्याची पूर्वाश्रमीची पत्नी अँबर हर्डविरोधातील (Amber Herd) खटल्यात त्याने यशस्वी लढा दिला. त्याचा हा खटला जगभर चर्चिला जात आहे. मात्र, दुसरीकडे अँबर हर्डला सगळीकडे ट्रोल केलं जातंय. यावर तिने पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. एका मुलाखतीत ती म्हणाली की, सोशल मीडिया युजर्स कोणताही निर्णय कसं काय घेऊ शकतात. जॉनी एक उत्तम अभिनेता आहे, असं म्हणत तिने ट्रोलर्सवर टीका केली आहे. (Johnny Depp Best Actor; Blunt answer to trolls from Amber Heard)

हेही वाचा – जॉनी डेपला ११६ कोटी रुपये देण्यास एम्बर हर्ड सक्षम नाही, वकिलाचा खुलासा

- Advertisement -

अँबर हर्ड या मुलाखतीत म्हणाली, “सोशल मीडिया युजर्स कोणताही निर्णय कसं काय घेऊ शकतात. ते अशाप्रकारच्या निर्णयापर्यंत कसे काय पोहोचू शकतात. मी त्यांना दोष देत नाहीये. मी समजू शकते की जॉनी एक प्रसिद्ध अभिनेता आहे आणि त्यामुळे लोकांना वाटतं की ते त्याला ओळखतात. पण तो एक उत्तम अभिनेता आहे. काय चुकीचं आहे आणि काय बरोबर आहे हे मी तुम्हाला सांगू शकत नाही. पण जर तुम्हाला मी चुकीची वाटत असेन तर सोशल मीडियावर निष्पक्ष प्रतिनिधित्व केलं जातं हे माझ्या डोळ्यात कोणी आत्मविश्वासने सांगू शकेल का? त्यामुळे माझ्याबद्दल लोक काय बोलतात याने मला काहीही फरक पडत नाही.”

हेही वाचा – एलॉन मस्क यांचं सुद्धा या वादग्रस्त खटल्यावर ट्विट

- Advertisement -

अँबर हर्ड आणि जॉनी डेप हे २०१५ साली विवाहबद्ध झाले होते. मात्र, दोनच वर्षांनी म्हणजे २०१७ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. दरम्यान, २०१८ मध्ये एका लेखामध्ये अँबर हर्डने जॉनी डेपवर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप केला होता. त्यामुळे संतापलेल्या जॉनी डेपने तिच्याविरोधात ५० मिलिअन डॉलरचा मानहानीचा दावा ठोकला. या खटल्याचा निकाल १ जून रोजी जॉनी डेपच्या बाजुने लागला. यानुसार अँबरनं जॉनी डेपला नुकसान भरपाई म्हणून १० मिलियन डॉलर द्यावेत असा आदेश न्यायालयानं दिला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -