किंग खानचा ‘जवान’मधील लूक व्हायरल? फोटो पाहून चाहते घायाळ

SHAHRUKH KHAN

गेल्या दोन दशकांपासून बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान सिनेरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. बॉलिवूड सिनेमे आवडणाऱ्या सिनेप्रेमींच्या मनात शाहरुख खानविषयी वेगळं आणि खास नातं आहे. त्याच्याविषयीचा जिव्हाळा, प्रेम त्याच्या विविध चित्रपटातून समोर येतच असतं. त्याच्या किशोरवयापासूनच्या लूकमध्ये आपण त्याला पाहिलं आहे. त्याला आतापर्यंत विविध रुपात, भूमिकेत आपण पाहिलं आहे. आता त्याचा सोशल मीडियावर असा एक लूक व्हायरल झालाय तो पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. त्याचा हा लूक त्याच्या आगामी जवान चित्रपटातील आहे का असा प्रश्न नेटीझन्सना पडला आहे. या फोटोमागची खरी कहाणी काय आहे हे जाणून घेऊयात.

लहान लहान केस, चेहऱ्यावर मध्यम आकाराची दाढी आणि मिशा अशा लूकमधील शाहरुख खानचा एक फोटो व्हायरल होतोय. या फोटोतील लूकमध्ये त्याच्या आयब्रोवर एक कट आहे. तर, एका कानात इअरिंग घातलं आहे. निळसर डोळे आणि गळ्याच्या बाजूला एक टॅटूही दिसत आहे. या फोटोतील हा लूक एकदम नवा असून या लूकमध्ये तो याआधी कधीही दिसला नव्हता. लूक नवा असला तरीही त्याच्या चेहऱ्यावरील ‘बॉलिवडूचा किंग खान’चा तोरा मिरवणाऱ्या रेषा स्पष्ट दिसत आहेत. तो थोडाफार हॉलिवूड हिरोंप्रमाणे या फोटोत दिसत आहे. त्यामुळे त्याचा हा लूक नक्की कोणत्या चित्रपटासाठी करण्यात आलाय असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. पण हा त्याचा लूक खरा नसून एडीटेड आहे. त्याच्या एका चाहत्याने ही कलाकारी केली आहे.

हेही वाचा – अक्षय कुमारचा ‘सेल्फी’ चित्रपट फ्लॉप तर शाहरुखच्या ‘पठाण’चा जलवा कायम

त्याचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच त्याच्या चाहत्यांकडून तुफान प्रतिसाद आले आहेत. काहींना त्याचा हा लूक आवडला आहे तर काहींनी या लूकवर नापसंती दर्शवली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)


शाहरूख खानचा पठाण हा चित्रपट गेल्या काही आठवड्यांपासून चित्रपटगृहांत धुमाकूळ घालत आहे. ३२ दिवसांत देशभरात 525 कोटींची कमाई या चित्रपटाने केली आहे. यामुळे कार्तिक आर्यनचा शहजादा आणि अक्षय कुमारचा सेल्फी चित्रपट आपटला. यापुढे, शाहरूख जवान चित्रपटात दिसणार आहे. तसंच, राजकुमार हिरानी यांचा डंकी या चित्रपटातही त्याची भूमिका आहे.

हेही वाचा – कोरिया दूतावासातील कर्मचाऱ्यांना ‘नाटू नाटू’ गाण्याची भूरळ; नरेंद्र मोदींनी केलं कौतुक