घरमनोरंजनयश वेबसिरीजचं फायदा ॲमेझॉन प्राईमचा, या ५ वेबसिरीज ठरल्यात सुपरहिट

यश वेबसिरीजचं फायदा ॲमेझॉन प्राईमचा, या ५ वेबसिरीज ठरल्यात सुपरहिट

Subscribe

देशी कन्टेन्ट असलेल्या बेव सिरीज प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहेत. आणि त्यामळे ऍमेझॉन प्राईम व्हिडिओ ओटीटीला जास्त प्रेक्षक पसंती मिळते आहे. जाणून घेऊया अशाच काही हिट ठरलेल्या वेब सिरीज विषयी यामुळे ऍमेझॉन प्राईमला व्हिडिओला सुद्धा प्रेक्षक जोडले गेले आहेत.

मनोरंजन क्षेत्राची परिभाषा बदलत वेब सिरीज या मोठ्या प्रमाणावर प्रदर्शित होत आहेत. मनोरंजन विश्वात विविध प्रयोग करत वेब सिरीज या नेहमी वेगळ्या ठरल्या आहेत. त्याच प्रमाणे त्या मोठ्या प्रमाणावर यशस्वी सुद्धा होत आहेत. वेब सिरीजना (web series) सुद्धा मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक पसंती मिळते आहे. खूप वेब सिरीज या मोठ्या प्रमाणावर हिट झाल्या आहेत. कोणतीही वेब सिरीज हिट झाली कि प्रेक्षक त्याच्या पुढच्या भागांची वाट पाहत असतात. अश्या या हिट ठरलेल्या वेब सिरीज ज्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीस होतात त्यामुळे ते ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्म (OTT over the top) सुद्धा चर्चेत येत असतात. प्रेक्षक सुद्धा या ओटीटी प्लॅटफॉर्म्सना मोठ्या प्रमाणावर जोडले सुद्धा जातात

जाणून घेऊया अशाच काही हिट ठरलेल्या वेब सिरीज विषयी यामुळे ऍमेझॉन प्राईमला व्हिडिओला (amazon prime video) सुद्धा प्रेक्षक जोडले गेले आहेत. ओटीटी प्लॅटफॉर्मने मनोरंजन विश्वात मोठ्या प्रमाणात बदल घडवून आणले मनोरंजनाचं एक नवीन एक्झाम्पल सेट करत ओटीटी प्लॅटफॉर्म वर प्रदर्शित होणाऱ्या वेब सिरीजनी मनोरंजन विश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. ऍमेझॉन प्राईम व्हिडिओ सुद्धा मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय होण्यासाठी या देशी वेब सिरिजचा सुद्धा त्यात मोठा वाटा आहे

- Advertisement -

१) मिर्झापूर –

मिर्झापूर(mirzapur) हि वेब सिरीज मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाली. या वेब सिरीज मधील कथानक, त्यातले कॅरॅक्टर आणि या वेब सिरीजचा देसी अंदाज यामुळे हि वेब सिरीज प्रेक्षक पसंतीस उतरली. या वेब सिरीजमुळे पंकज त्रिपाठी, अली फजल आणि दिव्येंदू शर्माला याना सुद्धा पॅरासिद्धी मिळाली. तर कालीन भैय्यापासून मुन्ना भाईपर्यंत या वेब सिरीज मधले सर्व कॅरेक्टरना मोठ्या प्राणावर लोकप्रियता मिळाली. आणि त्यामुळे ओटीटी प्लॅटफॉर्म सुद्धा लोकप्रिय झाला.

- Advertisement -

२) पाताल लोक – 

(patal lok)या वेब सीरिजने सुद्धा प्रेक्षकांना एक वेगळा अनुभव दिला. दिल्लीमधल्या एका पोलिसांची हत्या होते. आणि त्याचा तपास होताना कशाप्रकारे अस्वस्थपणा येतो हे या वेब सीरिजमधून पाहायला मिळत. जयदीप अहलावत आणि अभिषेक बॅनर्जी यांचा अभिनय या सिरीजमध्ये आहे.

३) पंचायत

पंचायत(panchayat) या वेब सिरीज मध्ये दाखविण्यात आलेली गोष्ट ही प्रत्येकालाच आवडली. गावाकडचं आयुष्य दाखवण्यात आलं आहे. या वेब सिरीजमधील सर्व पात्रं सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रेक्षक पसंतीस उतरली. या पात्रांची निरागसता. आणि आयुष्य जगत असताना छोट्या छोट्या गोष्टीत आनंद आणि समाधान मानून जगता येत. हे या वेब सिरीज मधून कळतं. गावाकडच्या जीवनातून मनोरंजन गायब होत चालले असतानाच या वेब सिरीज मध्ये पंचायतीची एंट्री होते पुढे घडणाऱ्या अनेक घडामोडी या वेब सिरीज मधून पाहायला मिळतात. या वेब सिरीज मधील नीना गुप्ता, रघुबीर यादव आणि जितेंद्र कुमार यांच्या भूमिका सुद्धा गाजल्या होत्या.

 

४) द फॅमिली मॅन

द फॅमिली मॅन(the family man) या वेब सिरीजचे सुद्धा दोन भाग प्रदर्शित झाले. दोन्ही भागांना प्रेक्षांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. या वेब सिरीजमध्ये अभिनेता मनोज वाजपेयी याची भूमिका आहे तर. या बेव सीरिजच्या दुसऱ्या भागात दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा हि निगेटिव्ह व्यक्तिरेखा साक्षरताना दिसली.

५) फोर मोअर शॉट्स प्लीज

(four more shorts please) आपल्या वैयक्तिक जीवनात संघर्ष करत जगणाऱ्या चार महिलांची कहाणी या वेब सिरीजमध्ये दाखवण्यात आली आहे. या वेब सिरीजमधून आधुनिक काळातील समस्यांवर भाष्य करण्यात आले आहे. रिलेशनशिप हा मुद्दा कथेच्या केंद्रस्थानी ठेऊन त्याभोवती हि कथा फिरते.

वेब सिरीजनी प्रेक्षकांनाच भरभरून मनोरंजन केले आहे हि गोष्ट महत्वाची आहेच पण त्याच बरोबर या वेब सिरीज या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ( OTT platform)प्रदर्शित झाल्या आहेत त्या ऍमेझॉन प्राईम व्हिडीओला( amazon prime video) सुद्धा प्रेक्षक पसंती मिळाली आणि त्यात या वेब सिरीजचा महत्वाचा वाटा आहे.


 

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -