घरकर्नाटक विधानसभा निवडणूक २०२३डीके शिवकुमार, सिद्धारमय्या ही नावं चर्चेत; मुख्यमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात?

डीके शिवकुमार, सिद्धारमय्या ही नावं चर्चेत; मुख्यमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात?

Subscribe

काँग्रेसने मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असणाऱ्या सिद्धरमय्या आणि डीके शिवकुमार यांना दिल्लीत बोलवले आहे.  त्यामुळे काँग्रेसकडून मुख्यमंत्री पदाची माळ कोणाच्या गळात पडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

कर्नाटक निवडणुकीच्या निकालात आतापर्यंत आलेल्या कलानुसार काँग्रेसने पूर्ण बहुमत जिंकण्याच्या मार्गावर आहे. असं असताना आता काँग्रेसने मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असणाऱ्या सिद्धरमय्या आणि डीके शिवकुमार यांना दिल्लीत बोलवले आहे.  त्यामुळे काँग्रेसकडून मुख्यमंत्री पदाची माळ कोणाच्या गळात पडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.(  DK Shivakumar Siddaramaiah are the names in discussion who will be Karnataka s Chief Minister )

कर्नाटकमध्ये काँग्रेस स्पष्ट बहुमताच्या दिशेने चाललं आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्रीपदाचा पेच सोडवण्यासाठी या दोन नेत्यांना दिल्लीला बोलावलं आहे. जे मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये झालं ते कर्नाटकात होऊ नये यासाठी काँग्रेस हायकमांडने आतापासूनच हालचाली सुरु केल्या आहेत.

- Advertisement -

सिद्धरमय्यांचं मत काय?

आउटलुकने दिलेल्या वृत्तात सिद्धरमय्या यांना मुख्यमंत्रिपदावरुन त्यांच्यात आणि शिवकुमार यांच्यात मतभेद आहेत का? असा प्रश्न विचाला होता. तेव्हा ते म्हणाले होते की, काँग्रेसने अद्याप मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केलेला नाही. मात्र, ते एक स्पर्धक जरुर आहेत.

मुख्यत्वे कर्नाटकात निकालापूर्वी पक्ष मुख्यमंत्र्यांचा चेहरा कधीच उघड करत नाही, असा काँग्रेसमध्ये प्रघात आहे. ही एक अतिशय लोकशाही प्रक्रिया असून जी वर्षानुवर्षे या ठिकाणी सुरु आहे. बहुमताने पक्ष सत्तेवर आल्यास प्रथम निवडून आलेले आमदार आपलं मत मांडतील. त्यानंतर हायकमांड त्यावर निर्णय घेतात.

- Advertisement -

दोन्ही नेत्यात तीव्र स्पर्धा

काँग्रेसला बहुमत मिळाल्यास सिद्धरमय्या आणि डीकेएस यांच्यातील सर्वोच्च पदासाठीची लढाई तीव्र होईल असे पक्ष कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. काँग्रेसच्या एका आमदाराचं म्हणणं आहे की, सिद्दरमय्या हे अधिक अनुभवी आणि ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांना सरकार चालवण्याचा अनुभव आहे. तर डीकेएस हे आव्हानात्मक नेते आहेत आणि सोनिया गांधींचे अतिशय विश्वासू मानले जातात. मात्र, अंतिम निर्णय हायकमांडचाच असणार आहे. त्यामुळे आता काँग्रेसकडून नेमका मुख्यमंत्री कोण होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मुख्यमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

( हेही वाचा Karnataka Assembly Election 2023 : कर्नाटकात भाजप पायउतार? ३८ वर्षांची परंपरा कायम; काँग्रेसला स्पष्ट बहुमत )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -