घरलाईफस्टाईलमुलं दिवसभर झोपत असतील तर खुश होण्याऐवजी ही आहे धोक्याची घंटा, कारण...

मुलं दिवसभर झोपत असतील तर खुश होण्याऐवजी ही आहे धोक्याची घंटा, कारण ऐकून व्हाल थक्क!

Subscribe

बाळ जर जास्त वेळ झोपत असेल तर या गोष्टीकडे का लक्ष दिलं पाहिजे आणि हे कोणत्या शारीरिक समस्येचं लक्षण असू शकतं का?

लहान बाळाचं सगळं करण्यात आईचा संपूर्ण दिवस जात असतो. त्यामुळे बाळ झोपल्यानंतर आईला कुठे सुखाचा श्वास घेता येतो. बाळ जितके जास्त झोपेल तितके चांगले असते असे बरेच जण समजतात. लहानबाळांना फार झोप येते आणि त्याला झोप लागणे हे चांगले सुद्धा असते. पण तुम्हाला माहित आहे का बाळाचे हे गरजेपेक्षा जास्त झोपणे हे त्याच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकते. हे कधी कधी फार गंभीर बाब ठरु शकते.

आजारपणामुळे किंवा थकवा आल्यामुले चार किंवा सहा महिन्याचे बाळ एक किंवा दोन तास झोपू शकते. पण याउलट बाळ जर दिवसभरात २० ते २२ तास झोपत असेल आणि दुध प्यायला देखील उठत नसेल, तर हा मात्र चिंतेचा विषय असू शकतो. कारण ह्या काळात बाळाच्या शारिरीक समस्येचा उगम होत असतो. जस जसे बाळाची वाढ ही होत असते तस तशी त्याची झोपेची गरज ही बदलत जाते. अमेरिकन एकेडमी ऑफ स्‍लीप मेडिसिनच्या अनुसार, नवजात ते १२ महिन्याच्या बाळांना १२ ते १६ तासांची झोप आवश्यक असते. तर एक किंवा दोन वर्षांच्या बाळाला दिवसातून ११ ते १४ तासांची झोप गरजेची असते. सामान्यत: नवजात बाळ तीन ते चार तासांच्या गॅपमध्ये ३० ते ४५ मिनिटे झोपते आणि एक वर्षाचे झाल्यावर ते रात्री उशिरा पर्यंत झोपण्यास सुरुवात करते. जर तुमचे बाळ एक किंवा दोन तास जास्त झोप काढत असेल तर ही एक सामान्य गोष्ट आहे. पण जर तो तीन ते चार तास जास्त वेळ झोपत असेल तर मात्र बाळाकडे नीट लक्ष द्यावे आणि वेळीच डॉक्टरांना दाखवावे.

- Advertisement -

बाळ जास्त वेळ झोपण्याचे कारण-

१- बाळाला लसीचा डोस दिल्यावर जास्त वेळ झोप येते.
२- इम्युनायझेशन दिवसा केल्याने बाळाला दिवसा जास्त झोप येऊ शकते.
३- बाकी दिवसांच्या तुलनेमध्ये एखाद्या दिवशी बाळाची शारीरिक हालचाल जास्त झाल्यास ते थकून जास्त वेळ झोपू       शकते.
४- संक्रमण किंवा लो ब्लड प्रेशरमुळे थकवा, सुस्ती आणि आळस येऊ शकतो.

- Advertisement -

 

बाळ जास्त काळ झोपत असेल तर त्याला उठवण्यासाठी उपाय-

१-बाळाला उठवण्यासाठी त्याच्या हातावर किंवा पायाच्या तळव्यांवर गोंजारू शकता.
२-गालावर हळुवार हात फिरवून त्याला उठवण्याचा प्रयत्न करावा.
३-जर बाळ दूध प्यायला सुरुवात केल्यावर काहीच मिनिटांत पुन्हा झोपत असेल तर त्याला स्तनांपासून दूर करून पहिले जागे करावे आणि मग पुन्हा दूध पाजावे.
४-सहा महिने किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या बाळांना खेळण्यात बिझी ठेवण्याचा प्रयत्न करावा आणि झोपेची वेळ होत नाही तोवर त्यांना झोपू देऊ नये.


हे ही वाचा- कोलेस्ट्रॉलसह वजनही कमी करायचय; मग करा चण्याचे सेवन

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -